तहसीलदारांनी मागवला फेरतपासणी अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:16 AM2017-08-13T03:16:50+5:302017-08-13T03:16:50+5:30
तलाठी व इतरांनी सादर केलेला अहवाल बोगस आणि घोटाळा दडपणारा असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच हादरलेल्या तहसीलदारांनी आता या प्रकरणी नवा सखोल तपासणी अहवाल
- रवींद्र साळवे
मोखाडा : तलाठी व इतरांनी सादर केलेला अहवाल बोगस आणि घोटाळा दडपणारा असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच हादरलेल्या तहसीलदारांनी आता या प्रकरणी नवा सखोल तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र गाजत असलेला मोखाड्यातील आदीवासीची जमीन बिगर आदीवासींना विकण्याच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा हितसंबंधीयांचा कट हाणून पाडला गेला आहे. तर जिल्हाधिकाºयांनी या संबंधीची सर्व पुरावे सोमवारी मागविले आहेत.
यामुळे बोगस खरेदी विक्री प्रकरणातील नाशिकचे घोटाळेबाज बिल्डर गिरीश खुशालचंद्र पोद्दार यांच्या व परभणीच्या एका आमदारांचे पीए असलेल्या नानासाहेब येवले यांच्या राजकिय दबावाला बळी पडणारे तहसीलदार शक्ती कदम यावेळी तरी नि:पक्षपातीपणाने या प्रकरणाची चौकशी करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
या प्रकरणातील आणखी कागदपत्रे मागविली असून सखोल फेरतपासणीअंती अहवाल सादर होईल.
-शक्ती कदम,
मोखाडा, तहसीलदार