सांगा! राजेंद्र गावित कोणत्या पक्षाचे?; शिवसेनेची उमेदवारी असताना प्रचार कमळाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:36 PM2019-04-20T23:36:22+5:302019-04-21T06:41:22+5:30
ना सेनेचे उपरणे ना खिशाला धनुष्यबाण
तलासरी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी गुरु वारी डहाणू विधानसभा मतदार संघात धावता प्रचारदौरा केला. बोर्डी, अस्वाली , वेवजी ,गिरगाव , घिमानिया, अच्छाड, बोरमाळ, उधवा, कोदाड, सायवन इत्यादी गावात त्यांनी भाजप शिवसेना कार्यकर्त्यांसह प्रचार मेळावे घेऊन मतदारांशी संवाद साधला. पण त्यांचा अधिक वेळ कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात गेला.
चाराच्या वेळी त्यांच्या गळ्यात अथवा खांद्यावर ना धनुष्यबाण असलेला स्कार्फ होता ना खिशाला सेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह लावलेले नव्हते.ते सेनेचे उमेदवार आहेत असे दर्शविणारे काहीही त्यांनी धारण केले नव्हते. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असा प्रश्न उपस्थितांना पडत होता. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात काटे की टक्कर मानली जात आहे.परंतु अद्यापही महाआघाडीमधील शिटी चिन्ह गायब झालेली बहुजन विकास आघाडीची डहाणू तलासरी भागात प्रचारात पिछाडी असल्याची चिन्हे आहेत.
सीपीएमने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन मोठी आघाडी मिळवून देण्याचे आश्वासन दिले असले तरी सीपीएम कार्यकर्त्यांसंह पदाधिकारी संभ्रम अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना सीपीएमची एकगठ्ठा असलेले मते मिळतील का ? माकपच्या नेत्यांनी जरी पाठिंबा देऊन भरघोस मताचे आश्वासन दिले असले तरी माकपचा पारंपरिक मतदार दुसऱ्या निशाणीला आपलेसे करेल का याबाबत डाव्यांनाच शंका आहे.