तापमानाची चाळीशी, दुपारी बाहेर पडणे टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 06:19 AM2019-04-01T06:19:03+5:302019-04-01T06:19:24+5:30

वसईकर घामाघूम : सागरी किनारपट्टी असून देखील पारा वाढताच, जिल्हा प्रशासनाने केल्या आरोग्याच्या सूचना

Temperatures, stay away from the afternoon! | तापमानाची चाळीशी, दुपारी बाहेर पडणे टाळा!

तापमानाची चाळीशी, दुपारी बाहेर पडणे टाळा!

Next

वसई : वसई या समुद्रकिनारा लाभलेल्या शहराच्या तापमानात मार्च संपल्यानंतर चांगलीच लक्षणीय वाढ झाली असून मे हिटचा तडाखा हा एिप्रल सुरू होण्यापूर्वीच बऱ्यापैकी जाणवू लागला असून वसईकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. सध्या देशात निवडणूकीच्या प्रचाराने आधीच वातावरण तापले असताना आता वसई शहराच्या तापमानाने तर या आठवड्यात ३८ ते ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. मात्र त्याहूनही अधिक यंदा कधी नव्हे ते हे तापमान ४२ अंशांचा ही पारा एिप्रल व मे मध्ये ओलांडेल अशी स्थिती असून आताच वसईकर चांगलेच घामाघुम होवू लागले आहेत..

वाढत्या तापमानामुळे सकाळी-दुपारी उष्णतेच्या तीव्र झळा लागू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे आता टाळत आहेत, मात्र तरीही काम, धंदे, आणि बाजारहाट करण्यासाठी तरी घराबाहेर पडणे जरु री आहे. तर या आठवड्यात मात्र वसईच्या बाजार परिसरात मात्र तुरळक गर्दी दिसून आली आहे. समुद्र किनारा, थंड व दमट असणारा हा तालुका आता मात्र उद्या पासून सुरू होणारा एप्रिल आणि मे मिहन्यात हॉट वसई सिटी म्हणून ओळखला जाणार असून हे तितकेच सत्य आहे. मागील दहा दिवसात वसई शहराच्या तापमानाचा पारा ३० अंशावरून पुढे जात ६३, 3८ आणि अगदी थेट ४० अंशावर गेला आहे. तर मागील आठवडयात वातावरणात काही प्रमाणात बदल झाला होता त्यावेळी वसईच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तापमानात थोडी फार घट देखील झाली होती.
दरम्यान आता पुन्हा तापमानाचा पारा या तीन दिवसात पुन्हा वर चढत असून तापमानाने थेट चाळीशी गाठली असून सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचे चटके व झळा जाणू लागल्या आहेत आणि या असह्य झळांपासून संरक्षणासाठी शेती, वाडी करणारे बागायतदार अगदी डोक्यात टोप्या व शहरवासी अंगावर कापडी वस्त्र व डोक्याला रु माल घेत असल्याने या कपड्यांना हि वसईत चांगलीच मागणी वाढली आहे.

विशेष व गंभीर म्हणजे एप्रिल- मे महिन्यात तापमानाचा उच्चांक सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला असून त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी तरी किमान बाहेर पडणे टाळावेअसे जिल्हा प्रशासन आणि पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

विक्रमगडचा पारा ३९ अंशावर, उकाड्याने लोक घामाघुम

च्विक्रमगड : मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाचा पारा ३९ अंशावर गेला आहे. दुपारीतर अंगाची लाहीलाही होत असून भर दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उकाडयाने अबाल व् द्ध हैराण झाले आहेत.

च्गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पशुपालक वर्ग मेटाकुटीला आला आहे.

च्सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असून अजून एप्रिल व मे महिने जायचे आहेत. उन्हाची तलखी वाढल्याने नदी, नाले, विहीरी कोरड्या पडल्या असून पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत.
 

Web Title: Temperatures, stay away from the afternoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.