दहा एकर शेती पाण्याखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:09 AM2018-04-06T06:09:17+5:302018-04-06T06:09:17+5:30
तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले.
- शौकत शेख
डहाणू - तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले. येथील ६० टक्के लोक रोजगारासाठी कायम स्थलांतरित असतात. त्यांचे दैनंदिन जिवन सोयीचे व्हावे म्हणून या पाणी उचल प्रकल्पामुळे एकूण १९ शेतकऱ्यांची दहा एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आरोहनचे डायरेक्टर नरेश जैन यांनी लोकमतला सांगितले.
तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधून आतापर्यंत २२३ शेतकºयांना लाभ मिळाला असून त्यामध्ये १४३ फळबाग लागवड, ४० मोगरा लागवड, ४० भाजीपाल्याची लागवड करणाºया शेतकºया शेतकरी आहेत.
मिरची, झेंडू, काकडी, मेथी, पालक, गवार, कलिंगड आदी पिके येथे घेतली जातात. शेतकºयांना पाणी व खत व्यवस्थापन, बाजारपेठ, पिकांची योग्य निवड या महत्वाच्या बाबींवर आरोहन ही संस्था शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करीत आहे.
यावेळी एसीपीएल डहाणूचे अहमद, अॅडमिन हेड चिंतामणी, प्रा.अंजली कानीटकर, संस्थापिका आरोहन, नरेश जेना आॅननरी डायरेक्टर, आरोहण राजेश मौर्या सहाय्यक व्यवस्थापक एसीजी, कौस्तुक घरत सहाय्यक कार्यक्र म अधिकारीे, भालचंद्र साळवे उपस्थित होते.
कार्यक्र मास तालुक्यातील शेतकरी मोठ्यासंख्येने हजर होते. या प्रकल्पामुळे आता शेतकºयांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. कार्यक्र माचे सूत्रसंचालन भालचंद्र साळवे, प्रस्ताविक रेजिना तर आभार प्रदर्शन प्रा अंजली कानीटकर यांनी केले .
पिकवलेला भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठ
या संस्था २००७ पासून मोखाडा व जव्हार तालुक्यात कार्यरत आहे. कुपोषण, दर्जात्मक शिक्षण शेती, पाणी व चांगले प्रशासन आदी विषयावर संस्थेने भरीव योगदान दिले असून वर्ष २०१६-१७ मध्ये संस्थेने डहाणू, पालघर मध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रमांवर काम सुरु आहे. शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला एसीजी कॅप्सुल कंपनी आपल्या कॅन्टीनमध्ये नियमित वापरेल व नेहमीच मदतीसाठी पुढे राहणार असल्याचा निर्धार एसीबी फाउंडेशनचे राजेश मौर्या यांनी केला.