अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:13 AM2017-09-17T04:13:40+5:302017-09-17T04:13:47+5:30

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवून ती गरोदर राहिल्यानंतर लग्नाला नकार देणा-या आरोपी वसईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पोस्को कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षाची शिक्षा सुनावली.

Ten years of imprisonment for the minor accused of raping a minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

Next

वसई : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवून ती गरोदर राहिल्यानंतर लग्नाला नकार देणा-या आरोपी वसईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पोस्को कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षाची शिक्षा सुनावली. याप्रकरणातील अन्य एका आरोपीची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
विरार पूर्वेकडील वीर सावरकर मार्गावरील केएमसी पार्क येथे राहणा-या एका १५ वर्षाच्या मुलीच्या तक्रारीवरून जाहिद मतीबूल रेहमान शेख आणि अन्य एका आरोपीविरोधात विरार पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा निकाल देताना जिल्हा सत्र न्यायाधिश एम. पी. दिवटे यांनी शेख याला पोस्को कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास शेखला सहा महिने अतिरिक्त कारवास भोगावा लागणार आहे. तर अन्य एका आरोपीची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे.

इस्लाम स्वीकारण्याची अट
पिडीत मुलगी सहा महिन्यांची गरोदर झाल्यानंतर आरोपी शेखने तिला इस्लाम धर्म स्विकारला तरच लग्न करीन अशी अट घातली होती. पिडीत मुलीने ही याला नकार दिल्याने आरोपी शेखने लग्नाला नकार दिला होता. तर दुसºया आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले होते.

Web Title: Ten years of imprisonment for the minor accused of raping a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा