मेनोरी खाडीवर पुलाच्या कामाची निविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 09:33 PM2019-07-28T21:33:50+5:302019-07-28T21:40:10+5:30
याआधी जेट्टीच्या आड पुलाचे बांधकाम होत असल्याचा ग्रामस्थांनी केला होता आरोप
मीरारोड - मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने मुलाच्या कामासाठी निवीदा कढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पावित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात बडड्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी शासन, पालिका आणि राजकारणी पुल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्यास स्थानिक जागरुक ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी निवीदा मागवल्या आहेत. या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजुर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुला सारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.
मुंबई , ठाण्यातील गावं बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरी सह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावच्या धारावी बेटावरील गावं उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसिर्गक पर्यावरणा सह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे , भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे , गावची संस्कृती कायम रहावी अशी भुमिका या विरोधा मागे धारावी बेट बचाव सह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.
पुल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारी देखील वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मुळात या ठिकाणी एस्सेल वर्ल्ड सारखे बडे उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केल्या असुन त्या विकासासाठी मोकळ्या करण्या करता तसेच त्यांच्या फायद्या करता शासन, पालिका आणि राजकारणी सातत्याने पुल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जॉजफ घोन्सालवीस, संदिप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.
शासन, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पुल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्यावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहित. गेल्या अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करुन देखील त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहित. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसताना देखील सुपाऱ्या घेऊन आमच्यावर लादत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय .