अखेर महासभेविनाच महापौर ,विरोधी पक्ष अशा सर्व  नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:33 PM2020-06-27T14:33:09+5:302020-06-27T14:34:26+5:30

वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल दि. 28 जून रविवारी संपत आहे. मागोवा घेतला तर दि.16 मार्चला अर्थसंकल्पाची सभा झाल्यानंतर कोरोना संक्रमण व केंद्र आणि राज्य सरकारच्या टाळेबंदीमुळे महापालिकेची एकही सभा झाली नाही, त्यातच पालिकेमध्ये नव्याने आलेले आयुक्त गंगाधरन डी  यांनी प्रत्यक्षात कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना न विचारता निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने हा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का होता.

term of all the corporators, mayor ended without a general meeting in vasai | अखेर महासभेविनाच महापौर ,विरोधी पक्ष अशा सर्व  नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात

अखेर महासभेविनाच महापौर ,विरोधी पक्ष अशा सर्व  नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात

Next

आशिष राणे,वसई
वसई विरार शहर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल महासभेविनाच आणि निरोपा शिवायच शुक्रवारी संपुष्टात आल्यानंतर सर्व नगरसेवक आणि खास करून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानी कमालीची नाराजी व्यक्त केली.


खरं तर शनिवार दि. 27 जून  हा चौथा शनिवार आल्याने सार्वजनिक सुट्टी त्यात कोरोना मुळे गर्दी व निरोप समारंभ करू शकत नाही,
त्यामुळे येथील सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ दोन दिवस आधीच 26 जून लाच संपल्यावर प्रत्यक्षात दि,28 जून ला पालिकेचा कार्यकाळ संपत असताना निरोपाची भाषणे हि करता आली नाहीत तसेच आयुक्तांनी कोणतीही संधीच न दिल्याने कोरोना च्या निमित्ताने  नवीन आयुक्तांच्या कार्यकर्तृत्वावर ताशेरेही मारता आले नाही. गंभीर म्हणजे पालिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत आहे. 

वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल दि. 28 जून रविवारी संपत आहे. मागोवा घेतला तर दि.16 मार्चला अर्थसंकल्पाची सभा झाल्यानंतर कोरोना संक्रमण व केंद्र आणि राज्य सरकारच्या टाळेबंदीमुळे महापालिकेची एकही सभा झाली नाही, त्यातच पालिकेमध्ये नव्याने आलेले आयुक्त गंगाधरन डी  यांनी प्रत्यक्षात कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना न विचारता निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने हा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का होता. त्यातच शहरात कोरोनाने घातलेल्या थैमानाला आवर घालण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महासभा घ्या या संदर्भात महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्तांना पत्रे ,निवेदन देऊन हि आयुक्तांनी  त्यावर निर्णय वजा उचित कार्यवाही न केल्याने अखेर आता 26 जून रोजीच नगरसेवकांचा कार्यकाळ हा महासभेविनाच संपुष्टात आल्याचे समोर आले आहे. 

28 जून पासून आयुक्त गंगाथरन हेच प्रशासकाच्या भूमिकेत ! डोकेदुखी वाढणार ?

दि.28 जून नंतर पालिकेवर आयुक्त गंगाथरन डी  यांची प्रशासक म्हणून राज्य शासनाने निवडणूक पुढे ढकलल्याने नेमणूक केली असल्याने पालिकेच्या इतिहासात निवडणुकी पूर्वीचा काळ सत्ताधाऱ्याशिवाय प्रशासकाच्या हातात असणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला बऱ्यापैकी बसण्याची श्यक्यता वर्तविली जात असून विरोधकांमध्ये मात्र प्रशासकाच्या हातात निवडणुकीपूर्वी महापालिकेचा कारभार गेल्याने मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
पाहू या आता आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन. डी आपली पुढची वाटचाल व कोणते हादरे,धक्के सत्ताधाऱ्यांना देतात याकडे तमाम महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाचे
नवनियुक्त आयुक्तच गंगाथरन देवराजन प्रशासक म्हणून त्यांची दि 29 एप्रिल2020 रोजी निवडणूक आयोगाने आदेश काढले होते,
लॉकडाऊनमुळे महापालिकेची निवडणूक स्थगित केल्याने राज्य सरकारचा निर्णय झाला होता.
यात दि.28 जून 2020 च्या मध्यरात्रीपासून वसई विरार शहर महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून सांभाळणार असून  8 एप्रिलला आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला व वीस दिवसांनी पुन्हा प्रशासक आदेश स्वीकारलेले गंगाथरन देवराजन  प्रशासकपदी नियुक्त झाल्यानं  आता 28 जून पासून आयुक्त व प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत सध्याचे आयुक्त पालिका प्रशासनाचा कारभार पुढे हाताळणार आहेत

Web Title: term of all the corporators, mayor ended without a general meeting in vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.