दीड कोटीचा बनावट माल जप्त, आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:41 AM2018-08-29T04:41:18+5:302018-08-29T04:41:57+5:30
तक्रारी वाढल्याने कंपनी झाली जागी
नालासोपारा : ग्राहकांना आॅनलाइन आणि रिटेल माध्यमातून विकल्या जाणाऱ्या बनावट उत्पादनांचे वाढते प्रकार थांबवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या मदतीने नालासोपारा येथील शैलेश रवारिया यांच्या दुकानावर छापा घातला. यात दीड कोटी रूपयांची बनावट एचपी उत्पादने सापडली.
या छाप्यात हजारो पॅकबंद एचपीचे स्टिकर असलेले बनावट टोनर कार्ट्रिज, इंक बॉटल्स, मशीन्स, लेबल्स आणि पॅकेजिंग साहित्य त पकडले गेले आहे. अशा बनावट उत्पादन युनिट्सद्वारे नकली एचपी उत्पादने भारतातील विविध ठिकाणी रिटेल करून पाठवण्यात येत होती. छापा घालणाºया चमूमध्ये कायदा सुव्यवस्था अधिकारी होते. त्यांनी बनावट उत्पादने ओळखली आणि वाळीव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस अधिष्ठाता विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक होते. बनावट उत्पादने बनवणाºया कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. आणि नितीन भीमजी वायिया या नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
च्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रिटेल दुकानांमधून किंवा आॅनलाइन बाजारपेठांमधून खरेदी केलेली उत्पादने बनावट असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून सातत्याने येत होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
च्कंपनीने या तक्र ारींचा तपास केला आणि ही उत्पादने गाळा क्र मांक ७, खान कंपाऊंड, गल्ली क्र मांक १७, नालासोपारा, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र या मुंबईच्या परिघावर असलेल्या बनावट एचपी उत्पादन युनिटकडून आल्याचे स्पष्ट झाले.