ठाकरेंनी वनगांना फसवले, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:47 AM2019-04-20T00:47:25+5:302019-04-20T00:47:53+5:30
श्रीनिवास तूच माझा पुढच्या खासदारकीचा उमेदवार अशी राणा-भीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मात्र श्रीनिवासच्या पाठीवर हात ठेवीत त्याला भूमिका बदलायला लावली.
पालघर : श्रीनिवास तूच माझा पुढच्या खासदारकीचा उमेदवार अशी राणा-भीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मात्र श्रीनिवासच्या पाठीवर हात ठेवीत त्याला भूमिका बदलायला लावली. अशी वनगा कुटुंबियाबरोबर फसवाफसवीचे राजकारण खेळणाऱ्यांना मतदार या निवडणुकीत धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असा टोला बहुजन विकास आघाडीचे आ. हितेंद्र ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मारला.
रणरणत्या उन्हाचे चटके बसू लागल्या नंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, योगी आदित्यनाथ, आदी सह आमदार, खासदारांच्या फौजा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरवीत कोट्यवधी रु पयांचे वाटप झाले होते अशा प्रतिकूल परिस्थितीत ५३ टक्के मते घेणारी बहुजन विकास आघाडी सध्या ‘मायक्र ो प्लॅनिंग’ च्या सहाय्याने आपले विजयाचे गणित जुळविण्यात व्यग्र आहे. मोठ्या प्रचार सभा मध्ये वेळ दवडण्यापेक्षा डोअर टू डोअर प्रचारात उतरली असून वसई तालुक्याचा प्रचार संपल्याचे आ. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.
वसईत पायात चप्पल घालून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणाºया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथाच्या विरोधात बेंबीच्या देठापासून कोकलणाºया सेनेवर आपल्या प्रचारासाठी पुन्हा त्यांनाच आणण्याची नामुष्की ओढवल्याची टीका त्यांनी केली.
इव्हीएम मशीन घोटाळ्याबाबत जे व्हायचे ते सर्वांचे होईल असे सांगून आपली तयारी पक्की असल्याचे सुचिवले. मराठ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांना आरक्षण द्यायला हवे होते पण दुसºयाच्या ताटातील नको असे सांगून पेसा अंतर्गत बाहेरच्या उमेद्वारापेक्षा सक्षम स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्या बाबत सर्व समाजाचे व पक्षाच्या नेत्यांची एकत्र बैठक बोलावू असेही ठाकुरांनी सांगितले.
राज ठाकरे च्या सभेला प्रचंड गर्दी होत असून त्यांनी केंद्र व राज्य सरकारची लक्तरे वेशीवर टाकताना पुरावेही सादर केल्याने त्यांच्या सभाचा नक्कीच परिणाम होईल असे सांगितले.उद्धव ठाकरे 1995 पासून माझी दहशत मोडून काढण्यासाठी ओरडतोय पाच वर्षे तुम्ही सत्तेत होता मग का नाही दहशत मोडून काढली? असा सवाल उपस्थित करून नवीन काहीतरी शोधण्याचा सल्ला त्यांनी दिला. अनेक सिने कलाकार मॉडेल म्हणू जाहिराती करीत असताना जिल्ह्यातील कुपोषण,पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्यशासनाने पालकमंत्री विष्णू सवरांची मॉडेल म्हणून निवड केली असून ‘हम नही सुधरे, तो तूम्हे कैसे सुधारेंगे’ अशी अवस्था त्यांची असल्याचे आ.ठाकूर यांनी सांगितले.
>गावित ५६ घरे बदलणारे सुसंस्कृत मतदार याचा विचार करणार
५६ घरे बदलणाºया आणि मतलबी अशी इमेज असणाºया उमेदवाराला इथला सुशिक्षित, सुसंस्कृत मतदार स्विकारणार नाही असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. डहाणूमध्ये माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी सहकारी पक्षाच्या मदतीने एक नंबरचे मताधिक्य घेत विक्र मगड, जव्हार, पालघर मध्ये संपर्कात असलेल्या सेनेच्या नाराज वर्ग आणि दिवंगत वणगाना मानणाºया लोकांची मदत आम्हाला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन सभेत उपाययोजने बाबत सवरा फक्त बघू असे मोघम उत्तर द्यायचे असेही ते म्हणाले.