रब्बीसाठी ठाणे जिल्हा बँक कर्ज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:14 PM2019-11-22T23:14:30+5:302019-11-22T23:14:35+5:30
शेतकऱ्यांना दिलासा; पावसाने नुकसान
पारोळ : वसईतील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असताना सोसायटीमधून घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे व रब्बी पिकासाठी कसा पैसा उभा करायचा असे दुहेरी संकट शेतकºयांपुढे उभे आहे. मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठा निर्णय घेतला असून या वर्षीचे खरीप पीक कर्ज असतानाच आता रब्बी पिकासाठी शेतकºयांना बँक कर्ज देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकºयांसाठी दिलासा देणारा असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
वसई तालुक्यात १० सेवा सोसायटी असून यावर्षी वसई पूर्व भागातील खरीप पिकासाठी २४५ शेतकरी यांना १ कोटी ४८ लाखांचे पीक कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने चांदीप शाखेतून केले. या कर्जावर शेतकरी यांनी भातपिक लागवड केली. दरवर्षी शेतकरी भाताचे पीक किंवा भाताचे तण विकून खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज फेडून पुन्हा रब्बी पिकांसाठी कर्ज उचलत असे. ते बिनव्याजी मिळत असल्याने खरीप व रब्बी कर्जाचा शेती करण्यासाठी शेतकºयांना मोठा फायदा होत असे. तोंडाजवळ आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने खरीप पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उभा असताना कर्ज नाही फेडले तरी रब्बी पिकांसाठी कर्ज दिले जाणार आहे.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी यांच्या पाठिशी असून या वर्षी संकटात असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्ज असतानाही आता रब्बी पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकºयांनी रब्बी पिकासाठी कर्ज घ्यावे.
- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक