ठाणे-पालघरच्या ३५ बोटी अद्यापही समुद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:32 AM2017-12-05T00:32:12+5:302017-12-05T00:32:17+5:30
कोलंबिया, माले बेटांकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी ठाणे-पालघरच्या समुद्रात धडकण्याची शक्यता आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : कोलंबिया, माले बेटांकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी ठाणे-पालघरच्या समुद्रात धडकण्याची शक्यता आहे. त्यातच, प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून सावधानतेचा इशारा देऊनही मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे- पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्यापही समुद्रात अडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किनाºयास लागण्याचे संदेश धाडण्यात आले आहेत. उशिरापर्यंत त्या पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्या किनाºयास लागेपर्यंत सर्वांचे लक्ष त्याकडे लागून आहे.
सुमारे ४८ तासांच्या कालावधीत ओखी चक्रीवादळ गुजरात व मुंबईच्या समुद्रात धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यांतील मच्छीमाºयांच्या सुमारे एक हजार ३८४ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. यापैकी एक हजार ३४९ बोटी ठिकठिकाणच्या किनाºयांवर सुखरूप लागल्याचा दावा येथील मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तालयाकडून केला जात आहे. उर्वरित पालघर जिल्ह्याच्या ३४ मच्छीमार बोटींसह ठाणे जिल्ह्यातील एक बोट अद्याप समुद्रात अडकलेली आहे. परंतु, या सर्व बोटी सुखरूप असून त्या वेळीच किनाºयावर लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
ओखी या जीवघेण्या चक्रीवादळापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून हवामान खात्याच्या सूचनेनुसार किनारपट्टीलगतच्या गावांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिका, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक, तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणांनादेखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छीमाºयांसह सर्वांना कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तर, समुद्रातील बोटींना जवळच्या किनाºयावर लागण्याचा संदेश देऊन खातरजमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातून ६९० मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यातील ६८९ बोटी परत येऊन किनाºयास लागल्या आहेत. उर्वरित एक बोट देखील उत्तन बंदरात लागणार आहे. त्यातील खलाशी सुखरूप असल्याचे माहिती आहे. झाई, वरोर, आगर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू, घिवली, उच्छेळी, नवापूर, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, वडराई, टेभी, दादरपाडा, केळवे, माहीम, केळवा, एडवण, कोरे, दातिवरे, किल्लाबंदर (अर्नाळा), पाचूबंदर, नायगाव आणि खोचिवडे आदी पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून ६९४ मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यापैकी ६६० बोटी किनाºयास सुखरूपपणे लागल्या आहेत. समुद्रात पालघरच्या अडकलेल्या ३४ बोटी किनाºयावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डहाणू बंदारातील भाग्यसाई, मातोश्रीप्रसाद, व गणेश धानमेहेर यांची भाग्यसाई या तीन बोटी समुद्रात आहेत. याशिवाय, धाकटी डहाणूची धनवृद्धी, एडवन बंदरातील जयदत्तसाई ही बोट परत आलेली नाही. तर, डहाणू बंदरातील १८७ पैकी १५७ बोटी परत आल्या असून उर्वरित २९ बोटी परतलेल्या नाहीत.
ढगाळ वातावरणाने तलासरीतील शेतकºयांची तारांबळ
समुद्रातील ओखी वादळामुळे तलासरी परिसरात सोमवारी दिवस भर ढगाळ वातावरण होते. परंतु या वातावरणामुळे मात्र आदिवासी शेतकºयाची चांगलीच तारांबळ उडाली. आधीच अनियमित पावसामुळे शेतकºयांच्या हाती भाताचे अल्प उत्पन्न आले आहे. त्यातच सोमवारी ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल की, काय या भीतीने खळ्यात कापून ठेवलेला झोडणी साठी असलेले भात सुरक्षित ठेवताना चांगलीच तारांबळ उडाली.काहींनी भाताच्या गंज्या प्लास्टिक कापडाने झाकल्या तर काहींनी धावपळ करून आपली झोडणी आटोपून घेतली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे तलासरी आठवडा बाजारातही फारशी गर्दी पहायला मिळाली नाही.