मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:41 PM2022-02-11T19:41:10+5:302022-02-11T19:41:23+5:30

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती .

The fire started at the dumping of Mira Bhayander Municipal Corporation on the second day | मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला लागलेली आग दुसऱ्या दिवशी सुद्धा भडकलेलीच 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंग मध्ये साचलेल्या कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग शुक्रवारी सायंकाळ पर्यंत विझलेली नाही . त्यामुळे उत्तन - डोंगरी परिसरातील लोकांची धुरा मुळे घुसमट सुरूच असल्याने लोक संतप्त आहेत . अग्निशमन दलाचे जवान गेल्या दोन दिवसां पासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा यश आलेले नाही .  

उत्तनच्या धावगी डोंगरावर पालिकेने साठवलेल्या कचऱ्याच्या डोंगरास गुरुवारी पहाटे दिड ते २ च्या सुमारास आग लागलेली आग आज शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सुद्धा धुमसत होती . अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडेंसह ४७ अधिकारी व जवान हे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते . ६ अग्निशामक बंब सह पाण्याचे ६ टँकर या कामी लागलेले आहेत . तर सुमारे ९० टँकर भरून पाणी मारून झाले असून आग मात्र विझलेली नाही . उलट वाऱ्याच्या जोरामुळे आग भडकत असल्याने आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक - दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका उपायुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली . कचऱ्याच्या ढिगात तयार होणाऱ्या मिथाईन गॅस मुळे आग लागली असावी किंवा कचरा वेचणारे वा असामाजिक तत्वांनी आग लावली असावी  अशी शक्यता उपायुक्तांनी वर्तवली आहे . 

दरम्यान आग व धुरा मुळे परिसरातील नागरिक संतप्त आहेत . गुरुवार पासून सर्वत्र घातक प्रदूषणकारी असा धूर पसरला असल्याने लोकांना शुद्ध हवा व श्वास घेणे अवघड झालेले आहे . शुक्रवारी काही नागरिकांनी ह्या प्रकरणी शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींना तक्रारी करून पालिकेवर कारवाईची मागणी केली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, साधारण २०१३ साला पासून पालिकेने येथे प्रक्रिया न करताच टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण तब्बल १२ ते १३ लाख मेट्रिक टन इतके आहे . तर रोज आणखी ६० ते ८० टन कचरा साचत आहे . 

 तर उपायुक्तांच्या सांगण्यानुसार मात्र १० लाख मेट्रिक टन कचरा साचलेला असून त्यातील २ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी पालिकेने ८ कोटी ९४ हजार रुपयांचा ठेका दिला आहे . त्यातील सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झालेली आहे . तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासना कडून निधीची मंजुरी मिळाल्यावर निविदा काढली जाणार आहे . तर रोज ५० ते ६० टन कचऱ्याची भर पडत आहे . 

Web Title: The fire started at the dumping of Mira Bhayander Municipal Corporation on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग