रिक्षात विसरलेला दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी मिळवून दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:14 PM2023-10-03T20:14:41+5:302023-10-03T20:15:33+5:30
भाईंदर पूर्व भागात राहणाऱ्या तनुजा तिखत्री ह्या घरून रिक्षाने गोल्डन नेस्ट येथे जात असताना त्यांचा लॅपटॉप , मोबाईल असा दिड लाखांचा ऐवज रिक्षाच्या मागील भागातच विसरून गेल्या .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - एका रिक्षात विसरलेला दिड लाखांचा ऐवज भाईंदरच्या नवघर पोलिसांनी महिलेस परत मिळवून दिला.
भाईंदर पूर्व भागात राहणाऱ्या तनुजा तिखत्री ह्या घरून रिक्षाने गोल्डन नेस्ट येथे जात असताना त्यांचा लॅपटॉप , मोबाईल असा दिड लाखांचा ऐवज रिक्षाच्या मागील भागातच विसरून गेल्या . त्यांना रिक्षाचा क्रमांक आदी काहीच माहिती नसल्याने पोलिसांना याची माहिती दिली .
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी केली . त्यात रिक्षा क्रमांक मिळाल्यावर ट्राफिक हवालदार नितीन बोरसे, ट्रॅफिक वॉर्डन महेश क्षिरसागर यांनी रिक्षाचा शोध सुरु केला .
रिक्षा मालकाशी संपर्क साधून महिलेच्या बॅग बाबत विचारणा केली असता त्यांना सुद्धा काही कल्पना नव्हती . रिक्षाची तपासणी केली असता प्रवासी सीट च्या मागील भागात बॅग आढळून आली . बॅगची तपासणी केली असता त्यातील लॅपटॉप , मोबाई आदी तसेच होते . सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील व वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते तनुजा यांना त्यांची बॅग पार्ट करण्यात आली . तनुजा यांनी पोलिसांचे आभार मानले .