वाघोबा खिंडीत एसटी ३० फूट दरीत कोसळली, दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:56 AM2022-05-28T08:56:55+5:302022-05-28T08:58:02+5:30

दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले : १३ जण जखमी

The ST fell into a 30 feet ravine at Palghar's Waghoba Pass | वाघोबा खिंडीत एसटी ३० फूट दरीत कोसळली, दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले

वाघोबा खिंडीत एसटी ३० फूट दरीत कोसळली, दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : भुसावळवरून पालघरकडे येत असलेल्या बोईसर डेपोच्या रातराणी बसच्या मद्यधुंद चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पहाटे ६ वाजता पालघरच्या वाघोबा घाटात कोसळली. या अपघातात १७ पैकी १३ प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी चालक दिनेश धनगर याला निलंबित केले आहे.

बोईसर डेपोतून भुसावळला गेलेली रातराणी गुरुवारी रात्री बोईसरकडे रवाना झाली. शुक्रवारी पहाटे ३ वाजता ही रातराणी नाशिकवरून बोईसरकडे जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ही बस वाघोबा घाटात ३० फूट दरीत कोसळली. ही बस खाली कोसळल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य प्रवाशांनी व स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. स्थानिक पोलीस, पालघर परिवहन विभागाचे वाहतूक नियंत्रक आशिष पाटील, पालघर डेपो मॅनेजर नितीन चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णलयासह पालघर आणि बोईसरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भुसावळवरून गुरुवारी रात्री निघालेली ही बस पहाटे ३ वाजता बोईसरच्या दिशेने रवाना झाली. १४७ किलोमीटर्सचे अंतर अवघ्या ३ तासांत पार करून ही बस भरधाव वेगाने पालघर वाघोबा घाटात पोहोचल्याने चालक खूप वेगाने बस चालवीत असल्याचे सिद्ध झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

अनेक प्रवाशांनी चालक मद्यपान केलेला असल्याबाबत प्रवाशांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हळू बस चालविण्याची विनंती धुडकावून चालकाने वेगाने बस चालविणे सुरूच ठेवल्याने अखेर त्याचे वाघोबा घाटात नियंत्रण सुटून ही बस घाटात कोसळली. 

या अपघातात एकूण १३ प्रवासी जखमी झाले असून त्यात ६ पुरुष,५ महिला आणि २ लहान मुले होती.

Web Title: The ST fell into a 30 feet ravine at Palghar's Waghoba Pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.