वसईत घरावर दरड कोसळून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; २ जण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:41 IST2022-07-13T14:40:38+5:302022-07-13T14:41:08+5:30
सदर घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.

वसईत घरावर दरड कोसळून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; २ जण बचावले
मंगेश कराळे
नालासोपारा - वसईच्या राजावली येथील वाघराळपाड्यात बुधवारी सकाळी एका घरावर दरड कोसळलेल्या दुर्घटनेत बाप व लेकीचा।दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) असे मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनसाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दोघांचा मृत्यू झाल्याचे पालघर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
सदर घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेच्या ठिकाणाखाली चारजण गाडले गेली असल्याची माहिती समोर आली होती. स्थानिक पोलीस व वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनांस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी दोन जणांना वाचवण्यात यश आले असून ढिगा-याखाली दोन जण अडकल्याची माहिती होती. मुसळधार पाऊस व परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे जेसीबी घटनास्थळी असे पोहोचू शकत नसल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. या दरडीखाली एक घर दाबले गेलेले आहे व त्यात वडील व मुलगी अडकल्याची शंका होती. अखेर अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) या दोन्ही बाप-लेकीचा ढिगा-याखाली अडकून मृत्यू झाला आहे. तर वंदना अमित ठाकूर (३३) व ओम अमित ठाकूर (१०) या आई व मुलाला वाचवण्यात यश आले आहे.