लॉकडाऊन काळात चोरीचा धंदा तेजीत; पालघरसह ठाणे, मुंबईमधील गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:17 AM2020-07-12T06:17:55+5:302020-07-12T06:18:30+5:30

महावीरसिंग कुमावत (३२, रा. सुरत) आणि मनीष सरकार (३५, रा. नालासोपारा पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत.

Theft business booms during lockdown; Crimes in Thane, Mumbai including Palghar revealed | लॉकडाऊन काळात चोरीचा धंदा तेजीत; पालघरसह ठाणे, मुंबईमधील गुन्हे उघड

लॉकडाऊन काळात चोरीचा धंदा तेजीत; पालघरसह ठाणे, मुंबईमधील गुन्हे उघड

Next

वसई : कोरोनाकाळात टाळेबंदीचा फायदा घेत चोरीचा धंदा तेजीत चालवणाऱ्या मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील विविध भागांत वाइन शॉप फोडून लाखोंचा मद्यसाठा आणि रोख रक्कम चोरणाºया दोघांना माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
महावीरसिंग कुमावत (३२, रा. सुरत) आणि मनीष सरकार (३५, रा. नालासोपारा पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चौकशीत त्यांनी आणखी एक साथीदार असल्याचे कबूल केल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.
वसई पूर्वेतील वसंत नगरीतील गोल्डन बिल्डिंगमधील सनी वाइन शॉपमध्ये काही दिवसांपूर्वी मद्यसाठा आणि रोख रक्कम असा आठ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी दुकान व्यवस्थापकाने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या नेतृत्वात आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
दरम्यान, माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या पोलीस पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

दहिसर पोलिसांच्या दिले ताब्यात
पोलिसांनी काही तांत्रिक बाबींच्या आधारे पथकाने दहिसर, काशिमीरा, वालीव आदी परिसरांत सर्च आॅपरेशन राबवले आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघा संशयितांना ४ जुलैला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी काशिमीरा, दहिसर आणि वसईमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. शुक्रवारी या आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना शनिवारी दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांनी दिली.

Web Title: Theft business booms during lockdown; Crimes in Thane, Mumbai including Palghar revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.