...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:40 AM2018-12-08T00:40:52+5:302018-12-08T00:41:01+5:30

भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास आहे...

... their wander from drought to drought | ...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

Next

- राहुल वाडेकर
विक्रमगड : भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास असून औरंगाबाद येथील आपल्या गावी दुष्काळ असल्याने त्यांनी विक्रमगडची वाट धरली होती. मात्र या भागातही दुष्काळ पडल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
वाढत्या महागाई व दुष्काळात कसा तग धरुन राहायचा व कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालू लागला आहे. आपली ही व्यथा प्रकाश भिका पवार व दिपक षिराले यांनी लोकमत कडे मांडली. ते सध्या रस्त्यावर आले झोपडे बांधुन वरवंटे, पाटे, उखळ आणि खलबंता विक्री करीत आहेत.
आज या गावी तर उद्या त्या अशा जीवनशैैलीमुळे मुलांचे शिक्षण, स्वत:चे घर या गोष्टी तर या लोकांसाठी आज तरी स्वप्नवत आहेत़ मैलोन मैल प्रवासातच त्यांचे अर्धे आयुष्य संपते़. पण वाढत्या महागाईने व गेल्या काही दोन चार वर्षापासून पडलेला दुष्काळ व त्याची वाढत असेलल्या तिव्रतायामुळे यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यापैकी प्रकाश भिका पवार व त्याचें कुंंटुंब गेल्या एक महिनाभरापूर्वी विक्रमगड-आलोंडा शहरात रस्त्याच्या कडेला वास्तव्यास आले आहेत. त्यांनी औरंगाबाद ते आलोंडा असा खाजगी टेम्पो करुन त्यांनी आपल्या वरवंटे, पाटे, उखळ, आणि खलबंते घेऊन प्रवास केला आहे. त्यातच दगड, गाढव, आपले कुटुंब व घरातील सामान असे साहित्य येथे आणले आहेत. महिनाभरात त्यांनी बºयाच दगडी वस्तु बनविलेल्या आहेत व त्या विक्री करण्यास ठेवलेल्या आहे़ गावी दुष्काळ असल्याने ते या भागात आले आहेत. दरम्यान. येथेही दुष्काळ असल्याने त्यांच्या दगडी वस्तु विक्रीची मागणी खुप कमी झाली असल्याचे त्यांनी सांगीतले़
हे कुंटुंब दगड फोडुन त्यातून वेगवेगळया वस्तु बनवून दारोदारी भटकत व आठवडा बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. ़हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असुन, आपण तो जोपासला असल्याचे सांगतात़ आज तरी आधुनिक युगात लोक वावरत असले तरी विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा ग्रामीण परिसर असलेल्या तालुक्यांत भागात दगडी वस्तुना मागणी आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी रोजीरोटीसाठी तहान, भूक आदी न बघता पोटासाठी दोन घास मिळावे यासाठी दिवसभर दगड फोडण्याचे काम करावे लागते. दगड फोडतांना त्याचा कस डोळयात अनेकवेळा उडतो कधी कधी त्याचा कचरा मार लागुन डोळा जाण्याचा संभाव असतो. मात्र आता हे आमचे रोजचेच असल्याने तेवढी दक्षता आम्हांस घ्यावी लागते व दुर्लक्षही करावे लागते असे पवार सांगतात.
दगडापासून जाते, पाटे, कुंडी, दिवा, कुंभई, भुताळ अशा विविध वस्तू बनवून भटंकती करावी लागते ़त्याचप्रमाणे आठवडा बाजारात या वस्तु विकण्यासाठी बसावे लागते़ या वस्तु दगडाच्या असल्याने ग्राहक त्या एकदाच खरेदी करतो, वारंवार घ्याव्या लागत नाहीत़ त्यामुळे रोजच पैसा मिळेल, याची खात्री नसते़ परंतु गेल्या दोन वर्षापासूनच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिवस या वस्तुंची मागणी घटली आहे़ तर त्यांनी या उद्योगाबाबत समाधान व्यक्त केले.
>आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामिण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी आहे़ आजचा बाजार भाव वाढत आहे़ वस्तु बनविण्याचा खर्चही जास्त येत असल्याने वस्तुंच्या किंमतीही वाढल्या असल्याचे प्रकाष पवार सांगतात़ त्याप्रमाणे जाते - १००. ते ८००, पाटा-५०० ते ६००, कुंडी-३०० ते ४००,दिवा-२०० ते ३००,खलबत्ता ४०० रुपयांना या वस्तू विकल्या जातात़ परंतु तुटपुज्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने उपाशीपोटी दिवस काढावे लागतात़ पावसाळा तर नुसता बसून घालवावा लागतो अशी खंत पवार यांनी व्यक्त केली़

Web Title: ... their wander from drought to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.