...तर शिक्षण पंढरीमध्ये येणार मद्यपींचे लोंढे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:36 AM2018-12-08T00:36:21+5:302018-12-08T00:36:28+5:30
डहाणू ते झाई या किनारी भागात थोड्या अवधीतच मद्याची दुकानं वाढत आहेत.
- अनिरुद्ध पाटील
डहाणू : डहाणू ते झाई या किनारी भागात थोड्या अवधीतच मद्याची दुकानं वाढत आहेत. येथे मिळणाऱ्या समुद्रातील माशांचे विविध पदार्थ आणि पाहिजे तो मद्याचा ब्रँड हाती मिळणार असल्याने थोड्या पैशात गोव्यासारखा अनुभव लुटता येणार असल्याने बार्डी परिसरात मद्य पर्यटनाला भरघोस पसंती मिळणार आहे. याचा सर्वाधिक फायदा लगतच्या गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने येथील तळीरामांना होणार असून हे लोंढे वाढणार आहेत.
दमण आणि सेलव्हासा बनावटीच्या मद्याची आयातही बोर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या करिता स्थानिक बेरोजगारांना हाताशी धरून मद्य तस्करीला उधाण येईल. त्याचा थेट परिणाम वाढती व्यसनाधिनतेतून दिसणार आहेत. तर बाटलीच्या मागे बाईचा चंचूप्रवेश व्हायला वेळ लागणार नसून खुलेआम वेश्या व्यवसायही सर्वात महत्वाचे म्हणजे आचार्य भिसे विद्यानागरीत केजीपासून ते पीजीपर्यंत सुमारे आठहजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शिवाय हे शैक्षणिक संकुल अगदी समुद्रकिनाºयालगत असून या भागातच चौपाटी आहे. येथे मद्यपी पर्यटकांनी धुडघुस घातल्यास त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. कदाचित हा संभाव्य धोका लक्षात घेता, या शिक्षण पंढरीत विद्यार्थी पाठ फिरवण्याची शक्यता तज्ज्ञांनी लोकमतकडे बोलून दाखवली.
बोर्डी परिसरात आजच्या घडीला चार बियरशॉप झाई किनाºयावर असून आगर (3), चिखले (2), बोर्डी आणि नरपड (1) असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयातून देण्यात आली. बार्डी ग्रामपंचायतीत नव्याने तीन बीयरशॉप व दोन परिमट रूमनां मंजुरी मिळाल्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर घोलवड ग्रामपंचायती अंतर्गत एकही मद्याचे दुकान नाही. दोन वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांनी या विरोधात बंड पुकारल्याने या विळख्यापासून गाव मुक्त झाले.