...तर भर समुद्रात सर्व्हेला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:13 AM2019-01-24T01:13:28+5:302019-01-24T01:13:32+5:30
च्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर : ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे उत्तन, वसई ते झाई-बोर्डी दरम्यानची मासेमारी ठप्प पडली असून मच्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
१ जानेवारी पासून समुद्रात ओएनजीसीच्या पोलर मर्क्युस या महाकाय जहाजा द्वारे बी ६६ या भागात सर्वेक्षण सुरु आहे. हे जहाज ५ नॉटिकल माईल्स च्या वेगाने २४ तास समुद्र तळातील वायू आणि तेल साठ्यांचा शोध घेत आहे.
२१ जानेवारी रोजी सातपाटी येथील पंकज म्हात्रे या मच्छीमारांच्या दिव्य लक्ष्मी बोटीला सर्वेक्षणातील एका महाकाय जहाजाने धडक दिल्याने त्याचे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले होते. राज्यपाल राम नाईक हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना मच्छीमाराना विश्वासात घेतल्या शिवाय ओएनजीसी अथवा इतर कंपन्या सर्वेक्षण करणार नाही असे आश्वासन मच्छीमार संघटनांना दिले होते. तसेच मच्छीमारांचे ५ सदस्य असलेली समिती ही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, या समितीला विश्वासात न घेता सर्व्हे सुरु करण्यात आला. बुधवारी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सभागृहात नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उत्तन, वसई, अर्नाळा, भाटी, मढ, सातपाटी, मुरबे, नवापूर, दांडी, डहाणू, झाई-बोर्डी आदी भागातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला एकजुटीने विरोध करीत सर्वेक्षणा ठिकाणी जाऊन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी लोकमतला सांगितले. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी २५ जानेवारी ला पुन्हा सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
>कवचे मोठे नुकसान
६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्सद्वारे हे सर्वेक्षण होणार असल्याने कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हजारो कवी उध्वस्त होऊन लाखो रु पयांचे नुकसान होणार आहे. तसेच. दालदा, वागरा, आदी मासेमारी जाळ्यांचेही मोठे नुकसान होणार असल्याने किनारपट्टीवरील मच्छिमारामध्ये मोठा प्रमाणात संतप्त भावना उमटत आहेत.