२९ ग्रा.पं.मध्ये अर्जच नाहीत सातची निवडणूक बिनविरोध

By admin | Published: November 4, 2015 12:19 AM2015-11-04T00:19:12+5:302015-11-04T00:19:12+5:30

पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीपैकी २९ ग्रामपंचायतीमधून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात न आल्याने उर्वरीत ११ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा

There are no appeals in 29 Gram Panchayat | २९ ग्रा.पं.मध्ये अर्जच नाहीत सातची निवडणूक बिनविरोध

२९ ग्रा.पं.मध्ये अर्जच नाहीत सातची निवडणूक बिनविरोध

Next

पालघर : पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीपैकी २९ ग्रामपंचायतीमधून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात न आल्याने उर्वरीत ११ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. तर इतर ७ ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्याची माहिती तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी चंद्रसेन पवार यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक पोटनिवडणुका पार पडल्या तर आठ तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतीमधील २५६ रिक्त झालेल्या जागासाठी १ नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या होत्या. पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या ८० रिक्त राहीलेल्या जागासाठी एकूण ५८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधून २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. एकूण ४० ग्रामपंचायतीमधील २९ ग्रामपंचायतीमधून नामनिर्देशीत पत्रेच दाखल करण्यात न आल्याने घिवली, बिरवाडी, नागझरी, उच्छेही, बेटेगाव, नावझे, रावते, अक्करपट्टी, दारशेत, जायशेत, लोवरे, खैरेग्रुप, चिंचारे, पथराळी, खडकोली, महागाव, गांजेढेकाळे, गुंदले, डोंगरे, किराट, तारापुर, काटाळे, पडघे, शेलवली, नवी देलवडी, एडवण, बऱ्हाणपुर, खानिवडे-गारगाव, मान या ग्रामपंचायतीमधून एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही.

मोरेकुरण, टेंभी, आलेवाडी, कर्दळ, नवीदापचरी, गिरनोली, वैगणी या सात ग्रामपंचायतीमधील जागा बिनविरोध झाल्या तर केळवा, नंडोरे, देवखोप, वाकसई, विराथन बुदू्रक या चार ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडल्या व आज झालेल्या मतमोजणी दरम्यान विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

Web Title: There are no appeals in 29 Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.