निवडणुकीच्या तोंडावर एकही गुंड वसईतून तडीपार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:11 AM2019-04-10T00:11:12+5:302019-04-10T00:11:25+5:30

वसईच्या प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित : प्रत्यक्ष मतदानाला काही आठवडे उरले असताना मतदार होणार प्रभावित

There is no criminal rift in the front of the election | निवडणुकीच्या तोंडावर एकही गुंड वसईतून तडीपार नाही

निवडणुकीच्या तोंडावर एकही गुंड वसईतून तडीपार नाही

Next

नालासोपारा : आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये वसई विरार परिसरामधून अद्याप एकाही गुंडाला तडीपार करण्यात आलेले नाही. पोलिसांनी पाठवलेले तडीपारीचे प्रस्ताव सध्या वसईच्या प्रांतअधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील सगळीकडे गुंडावर तडीपाराची कारवाई करण्यात आली असताना वसई तालुक्यातील गुंडांना कधी तडीपार करून चाप लावणार याकडे सर्व नागरिकांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.


प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीत कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हानात्मक काम असते. लोकसभा निवडणुकीत तर पोलिसांची कसोटी लागते. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणूकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाºया समाजविघातक प्रवृत्तींना आळा घातला जातो. पोलिसांकडून उपद्रव होऊ शकेल, शांतता भंग होऊ शकेल अशा गुंडाची यांदी तयार करून त्यांना तडीपार करण्याची शिफारस केली जाते. प्रांताअधिकाºयांकडे असे प्रस्ताव आल्यानंतर त्यांना प्रांत अधिकारी तडीपार करतात.


वसई विरार शहरात एकूण सात पोलीस ठाणी असून तीन विभागीय पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यांच्यामार्फत वसईच्या प्रांताधिकाºयांकडे तडीपारीसाठी २१ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. पण अद्याप पर्यंत एकही गुंड वसई तालुक्यातून तडीपार केला नाही.
निवडणुकीला २० दिवस उरलेले असताना एकही तडीपारीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नसून सगळीकडे आशर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या एका वर्षांपासून ते सहा महिन्यापासून गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरु द्ध योग्य ती कागदपत्रे जमवून तिचे प्रस्ताव तयार करून तडीपारच्या परवानगीसाठी पाठवलेले पण ते धूळ खात पडले असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने लोकमतला सांगितले आहे.
तसेच, निवडणुकीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मोठा धोका निर्माण होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे व आता नवीन कोणतेही तडीपारचे प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.


कुप्रसिद्ध ड्रग्जमाफियाचाही तडीपारचा प्रस्ताव धूळखात...
नालासोपारा शहरात अमली पदार्थ, ब्राऊन शुगर, गांजा यांचा व्यापार करणारा कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया इत्तेश्याम उर्फ श्याम मोहम्मद रफिक अन्सारी (४२) याचा संपुर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेला तडीपारचा प्रस्ताव गेल्या एक महिन्यापासून प्रांत कार्यालयात धूळ खात पडला आहे.
जर प्रांतांनी लवकर तडीपार केले असते तर गुन्हा दाखल झालेला एक पोलीस उपनिरीक्षक वाचला असता अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी इत्तेश्यामवर एनडीपीएसचे २ गुन्हे व १ मारामारीचा गुन्हा दाखल आहे. रंगपंचमीच्या दिवशी ब्राऊन शुगरसह पकडल्यावर आता ठाणे कारागृहात शिक्षा भोगत आहे.

 

पोलिसांनी प्रस्ताव पाठवले असून सध्या सुनावणी सुरू आहे. दोघांची बाजू ऐकुन घेतल्यावर पुढील सुनावणी करण्यात येईल. ही प्रकरणे सध्या प्रोग्रेसमध्ये असून लवकरात लवकर कारवाई होईल. मागील पोटनिवडणुकीत १३ लोकांना हद्दपार करण्यात आले होते.
- डॉ. दीपक क्षीरसागर
(प्रांताधिकारी, वसई)

Web Title: There is no criminal rift in the front of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palghar-pcपालघर