विधवा, अपंग, निराधारांना ५ महिने अनुदान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:11 AM2018-06-14T04:11:15+5:302018-06-14T04:11:15+5:30
केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
डहाणू - केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयात गोर गरीब व निराधारांना शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणारे धान्य ही गेल्या पाच वर्षापासून मिळत नसल्याने विविध आजाराने त्रस्त तसेच अंध, अपंग, निराधारांचे हाल होत आहे. समाजातील दीनदुबळे, अपंग, मागासवर्गीय जाती, जमाती याबरोबरच समाजातील वयोवृध्द, अपंग निराधार, क्षयरोगी, अविवाहित, घटस्फोटीत महिला, विधवा, कुष्ठरोगी, अंध, गंभीर आजाराने पिडित तसेच एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून दर महा चारशे तसेच सहाशे रूपये अर्थसहाय्य दिले जाते. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात वरील योजनेअंतर्गत बारा हजार लाभार्थ्यांना दर महा त्यांच्या बँकखात्यात अनुदान जमा केले जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून राज्यशासनाकडून तालुक्याला मिळणारे अनुदान वेळेवर म्हणजेच दर महिन्याला मिळत नसल्याने गोर-गरीबांचे हाल होत आहे. डहाणू तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले दिवसी, भवाडी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, इत्यादी बहुसंख्या दारिद्रयरेषेखालील लाभार्थी शासनाच्या या योजनेच्या अनुदानवरच उदरनिर्वाह करीत असल्याने गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यां बँक खात्यात पैसेच जमा न झाल्याने सुमारे ६० कि.मी. चा प्रवास करून हजारो लाभार्थ्यांवर दरमहा गंजाड येथील बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.
दिवसेंदिव भडकणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले असतांनाच शासनाकडून या निराधारांना तुटपुंजे अनुदान मिळते ते ही दर महा वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे पैशाअभावी हाल होत आहे.
यातील बहुसंख्य लाभार्थ तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भीक मागणारे स्थानिक आदिवासी आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाचा
किंवा इतर कुणाचाही आधार नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झाली
आहे.