उसगाव धरणात पाणी साठ्यात वाढ नाही
By Admin | Published: July 9, 2017 01:12 AM2017-07-09T01:12:32+5:302017-07-09T01:12:32+5:30
वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणापैकी उसगाव धरणात जुलै महिना सुरु झाला तरी अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. वसई विरार महापालिका हद्दीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणापैकी उसगाव धरणात जुलै महिना सुरु झाला तरी अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. वसई विरार महापालिका हद्दीत सूर्या पाणी पुरवठा योजनेतून १०० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंड धरणातून १ एमएलडी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणीपुरवठा होतो.
पाऊस उशिरा सुुरु झाल्याने धरणांच्या पाणी साठ्यात तितकीशी वाढ झालेली नाही. उसगाव धरणातील पाणी साठी मे २०१७ च्या तुलनेत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खूपच कमी असलेला दिसून येत आहे.
दरम्यान, सध्या वसई विरार शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ कायम आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर मासवण येथील नदीला पूर आल्याने पुराचे पाणी पंपिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. त्यामुळे पंपांमध्ये गाळ आणि कचरा घुसला आहे. परिणामी पंपांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.
पंम्पिंग स्टेशनमधील गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरु असल्याने अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.