विक्रमगडच्या आमसभेला चार वर्षात मुहुर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:43 PM2019-03-12T22:43:16+5:302019-03-12T22:43:44+5:30

जनतेचा संताप लोकसभेच्या पथ्यावर; विक्रमगड मागतायत आमदारांच्या कामाचा हिशेब

There is no sign of victory in the four years of Vikramgad assembly | विक्रमगडच्या आमसभेला चार वर्षात मुहुर्तच नाही

विक्रमगडच्या आमसभेला चार वर्षात मुहुर्तच नाही

Next

- राहुल वाडेकर 

विक्रमगड : गेल्या चार वर्षांपासून तालुका पंचायत समितीची एकही आमसभा होऊ शकलेली नाही. ही आमसभा न घेण्याबाबत गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या अचारसंहितेची कारणे पुढे केली जात असली तरी आगामी लोकसभा निवडणूकीवर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. आमदारांनी केलेल्या कामाचा जनता हिशेब मागत असून आमसभेला गत चार वर्षांत मुहुर्त न सापडल्याने विक्रमगडकर संताप व्यक्त करीत आहेत.

२००८ मध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेमध्ये विक्र मगड विधानसभा मतदार संघ तयार झाला. मात्र गेल्या ९ वर्षात तालुक्याचा विकासाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज, रोजगार अशा अनेक समस्या आ वासुन आजही उभ्या आहेत.

तालुक्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी तालुक्याची आमसभा गेल्या चार वर्षांपासून झालेली नाही. आमसभेत घेतलेल्या ठरावांना, तसेच आम जनतेकडून केलेल्या सार्वजनिक कामांच्या सुचनांना अनन्यसाधारण महत्व असते. विशेषत: दरवर्षी होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन ते तीन महिने आधी आमसभा घेणे बंधनकारक असते. या आमसभांमधून घेतलेले धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतुद करता येते मात्र, गेल्या चार वर्षात तालुक्यात एकही आमसभा झालेली नाही. गेल्या चार वर्षात विक्र मगड तालुक्यात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विविध कामांमध्ये झालेला लाखो रु पयांचा भ्रष्टाचार, कधी सुका तर कधी ओळा दुष्काळाची शेतकऱ्यांना न मिळालेली भरपाई अशा अनेक मुद्द्यावर येथील जनतेला या तालुक्याच्या आमसभेत मांडायचे होते पण आमसभा न झाल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

आमसभेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या निकाली लागतात, पण आमसभा न झाल्याने या समस्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
- संदेश राऊत, सामाजिक कार्यकर्त

आमसभा दरवर्षी होणे गरजेचे आहे. जेणे करु ण विक्र मगड तालुक्यातील खेडे-पाड्यातील प्रश्न आमदाराना कळतील. तालुक्यातील आमसभा न झाल्याणे सर्व सामन्याचे समस्या मांडायचे तरी कोणा कडे असा प्रश्न पडला आहे.
- लहु नडगे, नागरिक

गेल्या चार वर्षात आमसभा झाली नाही. या वर्षी ही आमसभा होणे धूसर आहे. या मागे आमदाराचे काम न करणाºया आधिकाºयाना पाठिशी घालण्याचे धोरण तर नाही ना? त्यात तालुक्यातील अनेक गैरव्यावहार उघड झाले आहेत त्यामुळे आमदारानी आमसभा घेणे गरजेचे आहे. - रविंद्र आयरे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: There is no sign of victory in the four years of Vikramgad assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.