भिवंडीकरांवर कराचा बोजा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 10:58 PM2020-02-18T22:58:40+5:302020-02-18T22:59:06+5:30
मूलभूत सुविधांवर भर : स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर, नागरिकांना दिलासा
भिवंडी : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यावर भर असलेले अंदाजपत्रक मंगळवारी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी स्थायी समितीचे सभापती हालीम अन्सारी यांच्याकडे सुपूर्द केला. या सुविधा पुरविताना नागरिकांना कुठल्याही प्रकारे कराचा बोजा टाकलेला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
भिवंडी निजामपूर पालिकेचा करवाढ नसलेला ८८० कोटी ३३ लाख ९९ हजार रकमेचे अंदाजपत्रक सादर केला. या वेळी स्थायी समिती सदस्य विलास पाटील, संतोष शेट्टी, इम्रान खान, वसीम अन्सारी, मदन नाईक, सिराज ताहीर इत्यादी उपस्थित होते. स्व.मीनाताई ठाकरे नाट्यगृह दुरु स्ती, बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन, अग्निशमन विभागाचे बळकटीकरण, सुसज्ज अग्निशमन विभाग, मार्केट बांधणे, वºहाळादेवी तलाव विकास व संवर्धन, शहरासाठी पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, भुयारी गटार योजनेस घरगुती मलवाहिन्या जोडणे, पालिका आरक्षणाखालील रस्ते विकसित करणे, पालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागा संरक्षित करणे, शहरातील कत्तलखाना कार्यान्वित करणे, शहरातील रस्ते विकासाची विविध माध्यमे वापरून रस्ते विकसित करणे, शाळा इमारत, स्वच्छतागृहाची दुरूस्ती इत्यादी प्रमुख बाबीवर भर देण्यात आला आहे. सरकारी नगरसेवक निधी, महिला व बालकल्याण, दुर्बल घटक, अंध व दिव्यांग कल्याण या लेखाशीर्षका-करिता बांधील खर्च वजा करता उर्वरित उत्पनाच्या ५ टक्केप्रमाणे तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. २०१९-२०२० चे सुधारित अंदाजपत्रक ६६७ कोटी ६७ लाख ९२ हजार होते तर २०२० -२०२१ मधील अंदाजपत्रक हे ८८० कोटी ३३ लाख ९० हजारांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीला आयुक्तांनी सादर केले.