योगाबद्दल जनजागृती व्हावी, समाज निरोगी राहावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:00 AM2020-01-19T00:00:35+5:302020-01-19T00:05:55+5:30
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त डहाणूच्या अकरा महिलांनी १५१ सूर्यनमस्कार घालून लिम्का बुकमध्ये नोंद केली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी जागृत करणाऱ्या योगशिक्षिका पूजा चौधरी यांच्याशी केलेली बातचीत.
- अनिरुद्ध पाटील
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त डहाणूच्या अकरा महिलांनी १५१ सूर्यनमस्कार घालून लिम्का बुकमध्ये नोंद केली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी जागृत करणाऱ्या योगशिक्षिका पूजा चौधरी यांच्याशी केलेली बातचीत.
लिम्का बुकात नोंद करणा-या महिलांकडून १५१ सूर्यनमस्कार करण्याची कल्पना कशी सुचली?
योग करणा-या महिला या सर्व गृहिणी असून समाजात त्यांना एक स्थान मिळावे, त्यांची एक छान ओळख
निर्माण व्हावी हा विचार मनात बरेच दिवस होता. या योग उपक्र माच्या माध्यमातून हे शक्य झाले. यासाठी मुंबईतील योग संस्थेच्या वतीने घेण्यात येणा-या कार्यक्र माची माहिती मिळाल्यानंतर कामाला लागलो.
हा विक्र म करण्यासाठी आपण कशी तयारी करून घेतली?
गेल्या दोन वर्षांपासून महिला माझ्याकडे योग-प्राणायम शिकायला येत असतात. त्यांना हा विक्र म करण्याचे सांगितल्यावर सर्व जणी खूश झाल्या. त्यात एक चांगल्या गोष्टींमध्ये नाव येण्याची कल्पना असल्याने जवळपास १० ते १२ दिवसांपासून आम्ही उत्साहाने सराव करायला लागलो. हळूहळू सूर्यनमस्काराची संख्या वाढवत गेलो आणि यशस्वीपणे सर्वांनी दिलेल्या वेळेत इव्हेंट पूर्ण केला. त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहावे व सुदृढ समाज निर्माण व्हावा, यासाठी योग शिबिराच्या माध्यमातून योगाचे महत्त्व समजावून सांगणे व जनजागृती करण्याचा प्रयत्न राहील. बुकात नोंद झाल्याने खास कुतूहल वाटत आहे. डहाणूत विविध स्तरातून या महिलांचे अभिनंदन केले जात आहे. पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा कार्यक्र मातून समाजामध्ये योग व व्यायामाची आवड निर्माण होऊन निरोगी आयुष्य जगण्याचे साधन असे योगाला महत्त्व प्राप्त होईल, असे मला वाटते.
डहाणूसारख्या ग्रामीण भागात आपण योग रूजविण्यासाठी कसे प्रयत्न केले?
पतंजली डहाणूच्या पदाधिकाºयांची व योग शिक्षिका दर्शना वोरा यांची खूप मदत झाली. आमच्या वर्गाला २० ते ६० या वयोगटातील २५ ते ३० महिला येत असून रोज दीड तास योगासने व प्राणायाम शिकवत असतो. नोकरी न करणाºया महिलांना घरकाम सांभाळून समाजात वावरणे, बाहेर पडणे या गोष्टी शक्य होत नाहीत. परंतु योग साधनेतील या कार्यक्र माच्या निमित्ताने महिलांना लिम्का बुकात नोंद झाल्याने समाधान आहे.
दोन वर्षापूर्वी पतंजली योगपीठ संस्थेमधून १ महिन्याचे योग शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले तसेच हरिद्वार येथे मुख्य योग शिक्षक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर महिलांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने पारनाका, डहाणू येथे रोज दीड तास मोफत योग प्रशिक्षण वर्ग सुरू केला.
योगवर्गाला येणा-या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निवारण झाले. या सर्व महिला पूर्ण निरोगी असल्याचा मला आनंद आहे - पूजा चौधरी