वसई तालुक्यामध्ये १५० बेकायदा शाळा, कारवाई करण्यासाठी होते दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:46 AM2019-08-11T00:46:57+5:302019-08-11T00:47:13+5:30

वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. तर या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षा धोक्यात आली आहे.

There were 150 illegal schools in Vasai taluka | वसई तालुक्यामध्ये १५० बेकायदा शाळा, कारवाई करण्यासाठी होते दिरंगाई

वसई तालुक्यामध्ये १५० बेकायदा शाळा, कारवाई करण्यासाठी होते दिरंगाई

googlenewsNext

विरार : वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. तर या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षा धोक्यात आली आहे. तर प्रशासनातर्फेया शाळांना नोटिसा बजावण्याव्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. या शाळांचे मालक गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाला फसवत आहेत. इतकेच नाही तर यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मात्र, पोलीस प्रशासन व शिक्षण विभाग हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून ठोस कारवाई केली जात नाहीे. या शाळांवर कारवाईची सुरूवात झाली असून प्रशासनातर्फे आतापर्यंत १८ शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, नोटिसा देऊनही शाळा मालक कसलीच हालचाल करत नसल्यामुळे प्रशासनाने पोलिसांची मदत घेतली आहे.
पोलीस कारवाईसाठी विलंब करत आहेत. शाळा मालकाला अटक केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई होत नाहीे, असे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचे म्हणणे आहे. शिक्षण मंडळाचा अंधाधुंदी कारभार सुरु असून त्यांनी विद्यार्थ्यांची कुठेच सोय केलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाने आतापर्यंत नोटिसा पाठवण्याशिवाय कसलीच कारवाई केली नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पोलीस कारवाईसाठी दिरंगाई करत आहेत.
वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना बेकायदा शाळा चालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ चा भंग करत असल्याने तत्काळ त्या शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच तालुक्यात बेकायदा असलेल्या शाळांना नोटिसा बजावून त्या बेकायदा असल्याचा फलक लावण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे. तर प्रशासनाने नुकतेच या शाळांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १३ शाळांवर कारवाई झाली असून इतर शाळांची चौकशी सुरु आहे.
वसई तालुक्यात बऱ्याच शाळा या प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु हे शाळेचे चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. शाळेला परवानगी नसतानाही अनेकदा मजले वाढवले जातात. विशेष म्हणजे या शाळांना प्रशासनातर्फे परवानगी दिलेली नसते. तर खालच्या दाराचे व कच्चे बांधकाम केल्यामुळे या शाळांच्या इमारतीत सतत गळती सुरु असते. स्वच्छता नसते जिने अरूंद आहेत, अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही.

शाळांच्या बाहेर कचºयाचे ढिगारे

बºयाच शाळा या नाल्याच्या बाजूला बांधलेल्या असतात. तर शाळांच्या बाहेर कचºयाचे ढिगारे असतात. यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता आहे. तसेच शाळेत पूर्ण दिवस दुर्गंधी असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही व पूर्ण दिवस त्यांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. प्रशासनाने आता युद्ध पातळीवर कारवाई सुरु करण्याची गरज आहे.

आम्ही युद्धपातळीवर कारवाई सुरू केलेली आहे. नोटिसाही बजावलेल्या आहेत. लवकरच बेकायदा शाळा बंद होतील.
- माधवी तांडेल, गटशिक्षण अधिकारी

Web Title: There were 150 illegal schools in Vasai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.