नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकासाठी ४० अर्ज, उडणार मोठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:40 AM2017-11-24T02:40:08+5:302017-11-24T02:40:28+5:30
जव्हार नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी गुरूवार पासून सुरू झाली असून दुपारी ३ पर्यत १ नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकपदासाठी ४० अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
हुसेन मेमन
जव्हार : जव्हार नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी गुरूवार पासून सुरू झाली असून दुपारी ३ पर्यत १ नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकपदासाठी ४० अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. विहीत नमुन्यातील आॅनलाइन अर्ज भरणा केल्यानंतर भरलेला अर्ज व सोबत कागपत्रे जोडून कार्यालयात जमा करण्याकरीता अनेक पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांची धांदल उडाली होती, अर्जातील अटींची पूर्तता करतांना नगरपरिषदेचे शौचालय वापरत असल्याबाबतचे प्रमाणपत्र, पाणीपटटी तसेच घरपटटी, कर भरणा तसेच उमेदवारीची अनामत रक्कम जमा केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले असून ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्यामुळे नगरपरिषद कार्यालय उमेदवार व कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. नगर परिषदेने आलेल्या अर्जांची छाननी करण्याकरीता कर्मचाºयांची व्यवस्था केली होती. त्यामुळे अर्ज बाद होण्याचे प्रमाण कमी राहणार आहे.
गुरूवारी दुपारी ३ वाजेपर्यत दाखल झालेल्या अर्जांची प्रभाग निहाय संख्या.
नगराध्यक्षपदासाठी १ अर्ज
क्र. १ अ - २ अर्ज
प्रभाग क्र. १ ब - २ अर्ज
प्रभाग क्र. २ अ - २ अर्ज
प्रभाग क्र. २ ब - १ अर्ज
प्रभाग क्र. ३ अ - २ अर्ज
प्रभाग क्र. ३ ब - २ अर्ज
प्रभाग क्र. ४ अ - ३ अर्ज
प्रभाग क्र. ४ ब - २ अर्ज
प्रभाग क्र. ५ अ - २ अर्ज
प्रभाग क्र. ५ ब - ३ अर्ज
प्रभाग क्र. ६ अ - २ अर्ज
प्रभाग क्र. ६ ब - ३ अर्ज
प्रभाग क्र. ७ अ - ३ अर्ज
प्रभाग क्र. ७ ब - ८ अर्ज
प्रभाग क्र. ८ अ - १ अर्ज
प्रभाग क्र. ८ ब - १ अर्ज
प्रभाग क्र. ८ क - १ अर्ज
तसेच शुक्रवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पुन्हा गर्दी होणार असून नगराध्यक्ष पदासाठीचे अर्ज दाखल होणार असल्यामुळे नागरीकांत कोणकोण हे अर्ज भरणार याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.