महोत्सवावर एक चित्रपट बनेल

By admin | Published: December 28, 2016 04:18 AM2016-12-28T04:18:04+5:302016-12-28T04:18:04+5:30

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवामुळे येथील वातावरण क्रीडा आणि कलामय होऊन जाते. महोत्सवासाठी उत्साहाने काम करणारे कार्यकर्ते, स्पर्धक आणि रसिकांची उपस्थिती

There will be a movie on the festival | महोत्सवावर एक चित्रपट बनेल

महोत्सवावर एक चित्रपट बनेल

Next

वसई : वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवामुळे येथील वातावरण क्रीडा आणि कलामय होऊन जाते. महोत्सवासाठी उत्साहाने काम करणारे कार्यकर्ते, स्पर्धक आणि रसिकांची उपस्थिती पाहता यावर सुंदर चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक राजेश म्हापुसकर यांनी वसईत बोलताना केले.
२७ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे सोमवारी रात्री उद्घाटन झाले. यावेळी म्हापुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रात्री क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केल्यानंतर ध्वजसंचलनाने महोत्सवाला सुुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी माजी कसोटीपटू विनोद कांबळी, श्रीशांत, अरुण केदार, समीर पाटील, महेश लिमये, मनीष वैष्णवी, प्रशांत मोरे, माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस, माजी खासदार बळीराम जाधव, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, महापौर प्रवीणा ठाकूर उपस्थित होते.
२४ व्या वर्षी कॅरममध्ये जागतिक विजेतेपद पटकावून विक्रम करणाऱ्या प्रशांत मोरे यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची माहिती दिली. खेळाडूने प्रत्येक खेळात चांगले खेळू या विचाराने खेळले पाहिजे. तरच तो खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असे मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, दुपारी चिमाजी अप्पा मैदानात धावणे, भालाफेक, हातोडा फेक, हँडबॉल, कराटे, फुटबॉल, हॉकी, धुर्नविद्या, पोहणे, जिम्नॅसियम, बॉक्सिंग, नेमबाजी या बारा खेळा प्रकाराचा लोगो असलेली मानवी साखळी बनवण्यात आली होती. हा जागतिक विक्रम झाल्याची घोषणा लिम्का वर्ल्ड रेकॉर्डचे आशिया विभाग प्रमुख मनीष वैष्णवी यांनी कार्यक्रमात करून प्रमाणपत्र दिले. रिओ आॅलिंपिकमध्ये ११ हजार ७०० स्पर्धक सहभागी झाले होते. आॅलिंपिक स्पर्धेत सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतात. मात्र, वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवात ५० हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग असल्याने हा जागतिक विक्रम झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असे वैष्णवी यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

माजी कसोटीपटू विनोद कांबळी यांनी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. तर श्रीशांत यांनी महोत्सवातून वसईकरांचे प्रेम, सन्मान आणि एकजुटीचे दर्शन झाले असे सांगितले. सध्या आपण हिंंदी आणि तामिळ चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याची माहिती श्रीशांत यांनी दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वसईकरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अपंग क्रिकेटपटू कैलाश घाणेकर, कवयित्री डॉ. पल्लवी बनसोडे, चेसपटू अभिषेक ठोंबरे, कराटे प्रशिक्षक बिजू नायर, बेस्ट डान्सर भांडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: There will be a movie on the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.