'वसईत पोलीस आयुक्तालय होणारच, कायद्यात राहात तर फायद्यात राहाल!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:31 PM2020-01-03T23:31:07+5:302020-01-03T23:31:11+5:30

विजयकांत सागर : पोलीस दलात मनुष्यबळ व साधनसामग्री यातही चांगली वाढ होणार

'There will be a police commissioner in Vasai, if you live in the law, you will benefit!' | 'वसईत पोलीस आयुक्तालय होणारच, कायद्यात राहात तर फायद्यात राहाल!'

'वसईत पोलीस आयुक्तालय होणारच, कायद्यात राहात तर फायद्यात राहाल!'

Next

नालासोपारा : लोकसंख्या वाढीचे प्रमाण आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे पोलीस बळ याचा ताळमेळ बसविणे अवघड आहे. अशाही परिस्थितीत आपले अधिकारी व कर्मचारी आपला कारभार नीट सांभाळत आहेत. मात्र आता आपल्याकडे लवकरच पोलीस आयुक्तालय येत असल्याने आपले मनुष्यबळ व साधनसामग्री यात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल. नागरिकांनी त्याबाबत निश्चिंत राहावे, असे आवाहन वसई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी वसई-नालासोपारा येथे केले.

पालघर पोलीस विभागाच्या ‘रेझिंग डे सप्ताहा’चे गुरुवारी संध्याकाळी नालासोपारा पोलीस ठाण्यात उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील (वसई), रेणुका बागडे (विरार), अमोल मांडवे (नालासोपारा) आणि त्या त्या विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. शहीद जवान संदीप सावंत व अर्जुन थापा यांना श्रद्धांजली व म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करून या कार्यक्र माची सुरुवात झाली. आपल्या भाषणात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर पुढे म्हणाले की, हा सप्ताह विविध सत्रात विभागून होणार असून या निमित्ताने विद्यार्थी, युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या समाजगटांना समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्वांना पोलिसांचे दैनंदिन कामकाज, शस्त्रे, नवे कायदे, स्वसंरक्षण, खबरदारी आणि न्याय्य हक्क यासंदर्भात योग्य ती माहिती दिली जाईल. सोबत जागृतीही केली जाईल. बेकायदेशीरपणे विदेशी नागरिक इकडे येतात, स्थिरावतात, वाहने घेतात आणि वर कायदा मानत नाहीत. अशांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. आपणच अशांना अधिक मोबदला मिळतोय म्हणून घरे भाड्याने देत आहोत, छोटी-मोठी वाहने देत आहोत हे योग्य आहे का? आता परदेशी नागरिकांची माहिती लपविणाऱ्या वा आश्रय देणाºया लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या समस्या आपण सारे मिळून दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या वेळी इतर उपस्थित पोलीस उपअधीक्षकांची देखील समयोचित भाषणे झाली.

या सोहळ्यात नालासोपारा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, तटरक्षक दलाचे सदस्य, पोलीस पाटील, मोहल्ला कमिटी मेंबर्स, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचलन वाहतूक पोलीस कर्मचारी राजेश गायकवाड यांनी केले. तर नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी आभार प्रदर्शन केले.

नागरिक व पोलिसांचा सन्मान करणार!
या सप्ताहात या भागात ज्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि पोलिसांना भरीव सहकार्य दिले अशांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचेही विजयकांत सागर यांनी सांगितले.

Web Title: 'There will be a police commissioner in Vasai, if you live in the law, you will benefit!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.