दिव्यांगत्वावर त्यांनी केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:40 AM2017-08-03T01:40:21+5:302017-08-03T01:40:21+5:30
तालुका शंभर टक्के आदिवसी असला तरी कागदावर दिसणारी शिक्षणाची प्रगती प्रत्यक्ष पाहिली असता दिसत नाही. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य ठरल्याची आकडेवारी वारंवार पुढे येत असताना
हुसेन मेमन ।
जव्हार : तालुका शंभर टक्के आदिवसी असला तरी कागदावर दिसणारी शिक्षणाची प्रगती प्रत्यक्ष पाहिली असता दिसत नाही. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य ठरल्याची आकडेवारी वारंवार पुढे येत असताना तब्बल १,२११ दिव्यांग विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षणाचे धडे गिरवत असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या सर्वांना शिक्षणाच्या मुख्य नाळेशी जोडण्याचे काम केले आहे जि. प.चे सहायक शिक्षक मिलिंद कांबळे यांनी.
तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६० हजार इतकी असून येथे शिक्षणा प्रसाराचा विषय आजही शासनासाठी तेवढा सोपा नाही. काबाड कष्ट करणाºया मजुरांची बिºहाडे बºयाचदा स्थलांतर करीत असतांना दिसतात. यामुळे अजुनही या भागामध्ये अशिक्षितपणा दिसून येतो. त्याकरीता जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत तालुक्यात १२ शासकीय आश्रम शाळा चालविल्या जातात, जि.प. अंतर्गत २४५ जिल्हा परिषद शाळा आहेत. तसेच पाच ठिकाणी खासगी व अभिमत शैक्षणिक संस्था असून, शहरात भारतीय विद्यापीठ व गोखले एज्युकेशन सोसायटीची शाळा व महाविद्याले आहेत.
या शैक्षणिक संकुलांमध्ये १ हजार २११ दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असून त्यांना जव्हार पंचायत समितीकडून शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. या अपंग विद्यार्थांना सहकार्य करणारे सहाय्यक शिक्षक मिलिंद कांबळे हे तळागाळातील आदिवासी अपंग विद्यार्थांना सर्वतोपरी मद्दत करणारे शिक्षक ठरले आहेत. ही प्रशस्ती सरकारी नसून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मिळाली आहे हे विशेष.
दिव्यांगानां शिक्षण घेतांना अनेक समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, सहायक शिक्षक कांबळे हे सतत त्यांच्या पालकांच्या संपकर् ात राहून विद्यार्थ्यांच्या हजेरी कडे, शैक्षणिक चढ उतारांकडे बारकाईने लक्ष ठेवत असतांना. शिवाय ते स्वत:ची ड्यूटी सांभाळून महिनाभरातून संबधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांना भेटून हालहवाल घेत असतात. अर्थातच या सक्रीयतेमुळे आज ते प्रत्येक पालकांना तसेच पालक त्यांना ओळखत आहेत.