‘ते’ एटीएम वसईतील नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:03 AM2018-06-21T06:03:46+5:302018-06-21T06:03:46+5:30
वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यातील एटीएम वसईमधील नसून ते आसाममधील तीनसुखीया या शहरातील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे
पारोळ : वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यातील एटीएम वसईमधील नसून ते आसाममधील तीनसुखीया या शहरातील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे, तसेच नालासोपाऱ्यातील याच बँकेच्या एटीएममध्ये स्फोट झाल्याचे जे वृत्त व्हायरल झाले आहे तेदेखील निराधार असल्याचे निष्पन्न झाले.
वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएमधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचे फोटोसह वृत्त व नालासोपाºयातील एचडीएफसीच्याच एटीएममध्ये स्फोट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने ते वसई-विरार परिसरात चर्चेचा विषय बनले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र पोलिसांनी अशी कोणतीही घटना वसई, विरार, नालासोपारा परिसरात घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असा चुकीचा, बिनबुडाचा मेसेज इतरांना पाठवताना सर्वात आधी त्याची खातरजमा करून मगच तो पाठवा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.