‘त्या’ इमारतींतील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:13 PM2019-06-06T23:13:45+5:302019-06-06T23:13:55+5:30

वसई, नालासोपारा, विरार मधील वास्तव : संक्रमण वसाहतींचा अभाव

They will force out the 'buildings' of the residents | ‘त्या’ इमारतींतील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढणार

‘त्या’ इमारतींतील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढणार

googlenewsNext

विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाली असून महानगरपालिकेने जबरदस्ती घरं खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अनेक रहिवाशांना पर्यायी सोय नसल्यामुळे अजूनही ते त्याच इमारतींमध्ये राहत आहेत.

दरवर्षी वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येणाºया धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. तीनुसार यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढल्याचे दिसून येते. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत ७३५ धोकादायक इमारती आहेत यातल्या २७२ अतिधोकादायक आहेत धोकादायक व अन्य वर्गात मोडणाºया ४६३ इमारती आहेत. महापालिकेने रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. परंतु बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याकरीता ट्रान्झीट कॅम्पची सुविधा देखील नाही. धोकादायक इमारती दुरुस्त होईपर्यंत अथवा पुन्हा तयार होईपर्यंत राहण्यासाठी पर्याय नसलेल्या रहिवाशांना रहाण्यासाठी लागणारे ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे आश्वासन देत आहे, परंतु त्यासाठी ठोस पावले उचलत नाही. रहिवाशांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्यांना स्वखर्चाने घर घेणं परवडणार नाही. त्यातही आता शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी त्यांना घर बदलणे शक्य होणार नाही. पालिकेकडे फक्त रात्र निवारा केंद्र आहेत पण ट्रान्झीट कॅम्पचे काय? रात्र निवारा केंद्रात इतकी मोठी संख्या राहू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका ट्रान्झीट कॅम्प बांधण्याचे अश्वासन देत आहे परंतु त्याबाबतीत ठोस पावले उचलत नसल्याने यावर्षी देखील अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत.
घरांचे भाडं वाढल्याने स्व खर्चाने घर घेण्या इतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने रहिवासी जीव मुठीत धरून त्याच इमारतींमध्ये राहत आहेत. रिहवाश्यांच्या जीवाला धोका असताना देखील महानगरपालिकेने मदत करण्यास नकार दिला आहे. तसेच रहिवाशांना इमारतींमधून काढण्यासाठी महानगरपालिके तर्फे पाणी कपात व वीज कपात देखील करण्यात येणार आहे. रिहवाश्यांनी इमारत सोडली तर बेघर होतील आण िनाहीच सोडली तर जीव जेईल अशी परिस्थिती असताना देखील पालिके तर्फे सक्ती दाखवण्यात येत आहे.

ट्रॅन्झीट कॅम्पची गरज : दरवर्षी हजारो लोकं बेघर होतात त्यांना पालिके तर्फे निवारा म्हणून ट्रान्झीट कॅम्पची गरज असते रात्र निवारा केंद्रात ६० ते 70 लोकं राहू शकतात पण कुटुंब असले तर त्यांना मोठी जागा लागते. यासाठी महानगरपालिकेने ट्रान्झीट कॅम्प उपलब्ध करणे गरजेचे आहे.

रहिवाशांना आपले घर स्वत: साकारावे लागेल. महापालिके तर्फे कसलीच मदत होणार नाही. आणि महापालिका आता सक्तीने इमारती खाली करण्याचा प्रयत्न करणार आहे. - दिलीप पालव, अग्निशमन विभाग अधिकारी

वसई- विरारमधील धोकादायक इमारती आणि संख्या

  • नवघर माणकिपूर 154
  • नालासोपारा पूर्व 156
  • नालासोपारा पश्चिम 92
  • वालीव 84
  • चंदनसार 77
  • आचोळे 60
  • वसई 52
  • बोळींज 25
  • पेल्हार 4
  • एकूण ७३५

Web Title: They will force out the 'buildings' of the residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.