बंगल्यामध्ये मुक्काम करणारा चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:52 PM2018-10-18T23:52:07+5:302018-10-18T23:52:17+5:30

साथीदाराच्या अटकेनंतर भांडाफोेड : वसईतील स्टेला भागातील प्रकार

thief in staying in bungalow | बंगल्यामध्ये मुक्काम करणारा चोर

बंगल्यामध्ये मुक्काम करणारा चोर

Next

नालासोपारा : चोर हा घरात चोरी करून पळून जातो. मात्र वसईतील माणिकपूर पोलिसांनी एका विचित्र चोराला अटक केली आहे. तो बंद घर आणि बंगल्यात चोरी करायचा, मात्र चोरी केल्यावर पळून न जाता त्याच बंगल्यात मुक्काम ठोकून पाहुणचार घ्यायचाय. वसईतील एका बंगल्यात तर त्याने तब्बल तीन महिने पाहुणचार घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
राजकुमार हा सडपातळ शरिरयष्टीचा असल्याने तो बंगल्याच्या खिडकीच्या गजातून, एक्झॉस पंख्याच्या खिडकीतून आत प्रवेश करायचा. आत कुणी नाही हे लक्षात आल्यावर तो तेथेच रहात होता. त्याच्या एका साथीदाराला अटक केल्यानंतर माहिती उघड झाल्याचे पो.नि. आसिफ बेग म्हणाले.
वसई विरार परिसरात अनेक बंगले आहेत. अनिवासी भारतीय तसेच मुंबईत राहणाऱ्यांनी वसई विरार शहरात बंगले घेऊन ठेवले आहेत. तेथे ते वर्षातून क्वचित येत असतात. नेमकी हीच बाब राजकुमार निशाद उर्फ ब्रिजेश यादव (२५) या चोराने हेरली. तो ज्या बंगल्यात कुणी रहात नाही त्यात शिरून चोरी करायचा. तसेच त्याच बंगल्यात तो मु्क्काम ठोकायचा. तेथून मग इतर ठिकाणी चोरी करायला जायचा. स्टेला येथील एक दुमजली बंगल्यात त्याने चोरी केली आणि त्या बंगल्यात तब्बल तीन महिने मुक्काम ठोकला होता. या बंगल्याचे मालक दुबईला राहतात.तो दिवसा बंगल्यात रहायचा. सकाळचा नाष्टा बनवायचा. एसी लावून झोपायचा. टिव्ही बघायचा. रात्री मात्र तो दिवे लावत नव्हता. या बंगल्यात राहून तो रात्री इतर ठिकाणी चोरी करायला जात होता.

सगळे गुन्हे उघडकीस
राजकुमार याच्याकडून विविध ठिकाणी चोरी विविध घटनांमधील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एरवी चोरी करून बंगल्यात मुक्काम ठोकणाºया या अविलयाचा आता मुक्काम पोलीस कोठडीत झाला आहे.

Web Title: thief in staying in bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.