चोरट्यांनी केले महिलांच्या डब्याला लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:07 AM2018-08-28T05:07:30+5:302018-08-28T05:07:55+5:30
पाच वर्षे केली लुटालूट : विरार ते वैतरणा दरम्यानच्या प्रवासात करायचे चोऱ्यामाºया
नालासोपारा : पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यात भुरट्या चोरांकडून गेल्या पाच वर्षात ३९ लाख ३६ हजार ८२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. विरार ते वैतरणा या दोन स्थानकादरम्यान गेल्या पाच वर्षात महिलांच्या रेल्वे डब्यात चेन, मंगळसूत्र,पर्स व मोबाईल चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत.त्यात ३९ लाख ३६ हजार ८२ रुपयाच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. या दोन स्टेशनादरम्यान एवढ्या मोठ्या मुद्देमालाची चोरी झाल्यामुळे पालघर, डहाणू विभागातील महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे मिरा रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान आहे. सन २०१३ या वर्षात चोरीच्या १२ घटना घडल्या असून त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात ४३९९०० रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी २९६९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१४ या वर्षात चोरीच्या २० घटना घडल्या असून त्यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात १०६५५१० रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता .त्यापैकी १९११०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सन २०१५ या वर्षात चोरीच्या ७ घटना घडल्या असून त्यापैकी ३ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 386429 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 124670 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2016 या वर्षात 5 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 170424 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता . त्यापैकी 53750 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2017 या वर्षात 30 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी ? गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 681747 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी 36699 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2018 या वर्षात 38 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 1192072 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 20500 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षा धोक्यात, तपासात येतात अडचणी
च् वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी याबाबत रेल्वेकडून माहिती मिळवली असता फक्त एका स्थानकादरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या डब्यात चो-या होऊ लागल्याच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
चोºया भुरट्या स्वरुपाच्या असल्याने व गुजरातची सीमा अगदी जवळ असल्याने गुन्हेगार हिस्ट्रीशिटर नसतात. त्यांची कोणतीही कुंडली पोलिसांकडे नसते. गुन्हा केला की ते परराज्यात पळून जातात. यामुळे तपासात अडचणी निर्माण होतात