वसई-विरारला तिसरे धरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:06 AM2019-11-22T00:06:56+5:302019-11-22T00:08:46+5:30

महासभेत मिळाली मान्यता; प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभागाकडे पाठवण्याचा मार्ग मोकळा

Third dam to Vasai-Virar? | वसई-विरारला तिसरे धरण?

वसई-विरारला तिसरे धरण?

googlenewsNext

वसई : वसई - विरार शहराचे वाढते नागरीकरण पाहता भविष्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी खोलसापाडा पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचे पाणी वसई - विरार शहरासाठी आरिक्षत करण्याच्या आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाच्या प्रस्तावास महापालिका सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेल्हार आणि पापडखिंड या दोन मालकीच्या धरणानंतर स्वत:चे असे तिसरे खोलसापाडा नामक धरण वसई - विरार मनपाला मिळणार आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, याकरिता वसई - विरार महापालिका पाण्याच्या विविध योजनांवर काम करत आली आहे. यात सर्वप्रथम सूर्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने स्वत:चे देहरजा धरण उभारण्याचे काम सुरू केले. तर दुसºया बाजूला वसई पूर्वेतील राजावली, तिल्हेर आणि सातिवली येथे साठवण तलावाच्या कामांना गती दिली असतानाच आता लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत खोलसापाडा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा आणि त्याच्या आर्थिक खर्चाचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे ११० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

शहर पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खोलसापाडा हा प्रकल्प वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगत आहे. या प्रकल्पाचे जवळपास शंभर टक्के पाणी हे वसई-विरार शहरासाठी आरक्षित केल्यास या परिसरातील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. विशेषत: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणी उपलब्ध करून देणे मनपाला अधिक सोयीचे होणार आहे.

प्रशासनाची खर्चास मंजुरी
या खोलसापाडा - १ या पाटबंधारे प्रकल्पास पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याबाबत तसेच प्रकल्पाचा अंदाजे ११० कोटींचा खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव वसई-विरार मनपाच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यास तसेच आर्थिक खर्चास सभेची मंजुरी मिळाल्याने आता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि त्यामार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर करण्याचा मार्ग तूर्तास तरी मोकळा झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता माधव जवादे यांनी सांगितले.

कसा असेल प्रकल्प !
7.80 चौ कि मी पाण्याच्या
साठ्याची एकूण व्याप्ती
13.64 दशलक्षघनमी एकूण पाणीसाठा क्षमता
12.8183 दशलक्षघनमी पिण्याचे
पाणी होणार उपलब्ध

काय असतील तरतुदी !
या प्रकल्पाची १०० टक्के मालकी ही वसई - विरार मनपाची असेल. या धरणातील १०० टक्के पाणी हे याच महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. या प्रकल्पातून उचलण्यात येणाºया पाण्याचे स्वामित्वधन महानगरपालिकेकडून घेऊ नये, आणि पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून याबाबतीत काम पाहील अशा तुर्तास तरी तरतूदी रहातील. मात्र कोकण पाटबंधारे विभाग प्रत्यक्ष कामाच्या वेळी मार्गदर्शक राहील.

Web Title: Third dam to Vasai-Virar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.