तिसऱ्या टप्प्यात १२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:18 PM2019-08-30T23:18:29+5:302019-08-30T23:18:35+5:30

अधिकारी-कर्मचारी नाराज : नागरिक सुखावले

In the third phase, transfer of 121 employees | तिसऱ्या टप्प्यात १२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

तिसऱ्या टप्प्यात १२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next

आशिष राणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई - विरार शहर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त बळीराम पवार यांनी पुन्हा तिसºया टप्यात १२१ कर्मचाºयांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. आयुक्तांच्या या धडाकेबाज निर्णयामुळे पालिका हद्दीत काही नाखूष व कामचुकार कर्मचाºयांची ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली असल्याचे समजते. किंबहुना मागील नवघर माणिकपूर नगरपरिषद स्थापनेपासून एकाच विभागात व टेबलावर फेविकॉलसारखे चिकटून बसलेल्या कर्मचाºयांना तर दणका दिला.


वसई-विरार महापालिकेत एकूण ९ प्रभाग समिती कार्यरत असून या सर्व समित्यांमधील लिपिक वरिष्ठ लिपिक, टंकलेखक, उपअधीक्षक आणि अधीक्षक पदाच्या अंतर्गत बदल्या विविध प्रभागात करून बहुतांश जणांची खाती देखील बदलण्यात आली आहेत.
पालिका आयुक्तांनी रुजू झाल्यावर मे - जून नंतर जवळपास २०० पेक्षा अधिक बदल्यांचा सपाटा लावला जाईल, असे सूतोवाच केले होते, आणि ते आज खरे होताना दिसत आहे. आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात जूनमध्ये नऊ प्रभाग समितीतील प्रभारी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये काहींना प्रभाग समितीपदी विराजमान केले तर काहींना हातात नारळ देत त्यांची पदावनती केली.
गेल्या आठवड्यातच दुसºया टप्प्यातील ६४ वरिष्ठ लिपिक आणि अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि आता तिसºया टप्प्यात १२१ जणांच्या बदल्या आता करण्यात आल्या आहेत.


महापालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे सांगत आयुक्त पवार यांनी या बदल्या करताना अनेक वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांची खाती बदलल्याने धाबे दणाणले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या झाल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर नवीन खाती, नवीन जागी या कर्मचाºयांना जम बसण्यात वेळ लागेल आणि त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

सर्वांचे धाबे दणाणले
वसई - विरार मनपाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे सांगत आयुक्त पवार यांनी अनेक वर्ष एकाच ठिकाणी एकाच पदाला चिकटून बसलेल्या कर्मचाºयांची खाती देखील बदलली.

Web Title: In the third phase, transfer of 121 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.