वीट व्यवसायावर तिसऱ्या वर्षीही संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:10 AM2018-03-17T03:10:07+5:302018-03-17T03:10:07+5:30

विक्रमगड तालुक्यामध्ये विटभट्टी व्यवसायाचे जाळे हे मोठ्या प्रमाणात असून आहे. गेल्या तीन वर्षापासून घसरल्याने व्यवसायाला मोठी घरघर लागली आहे.

In the third year of brick business | वीट व्यवसायावर तिसऱ्या वर्षीही संक्रांत

वीट व्यवसायावर तिसऱ्या वर्षीही संक्रांत

Next

विक्रमगड तालुक्यामध्ये विटभट्टी व्यवसायाचे जाळे हे मोठयाप्रमाणात असून आहे. गेल्या तीन वर्षापासून घसरल्याने व्यवसायाला मोठी घरघर लागली आहे. एकेकाळी विटांचा भाव हा चार ते साडेचार हजारापर्यत होता. तो एकदम अडिच ते तीन हजारावर आलेला आहे़ तसेच त्यासाठी लागणाºया जिन्नसाही महागल्या आहेत. मागणी आणि निर्मिती मधील या तफावतीमुळे भाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. गौण खनिज उत्खन्नाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाची परवानगी अनिवार्य केल्याने आवश्यक त्या परवानगी शिवाय रेती, डबर मिळणे कठीण असल्याने सरकारी,निमसरकारी, खाजगी बांधकामे मोठया प्रमाणावर बंद पडली आहेत. त्यातच सिमेंट ब्लॉकलाही बाजारामध्ये मागणी वाढत असल्याने विटांचे महत्व कमी होत चालेले आहे़ दरम्यान, विटांसाठी तूस, दगडी कोळसा, माती, भट्टीसाठी जागा, मजूर तात्पुरती बिनशेतीची परवानगी, रॉयल्टी, जमीनीचा धारा आदींसाठी गतवर्षीच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागत असल्याने त्याचा परिणाम होऊन किंमतीही वाढल्या आहेत.

Web Title: In the third year of brick business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.