‘त्या’ ६५ विद्यार्थ्यांना प्रवेश नाही : संतप्त पालकांचा जव्हारला विद्यार्थ्यांसह बेमुदत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:26 AM2018-08-14T02:26:32+5:302018-08-14T02:26:52+5:30
आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या शैक्षणिक व अन्य सोयीसुविधा मिळत नसल्याने, आदिवासी विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी या नामांकित शाळेची मान्यता रद्द केली.
जव्हार : आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या शैक्षणिक व अन्य सोयीसुविधा मिळत नसल्याने, आदिवासी विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी या नामांकित शाळेची मान्यता रद्द केली. मात्र तीन महिने उलटूनही ती मधील आदिवासी विद्यार्थ्यांचे समायोजन केले नसल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवार पासून येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर मुलांसमवेत बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे.
जव्हार व डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातील ६३ आदिवासी विद्यार्थी इंग्लिश माध्यमातील शिक्षण घेण्यासाठी सन २०१५-१६ या वर्षात पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी इंग्लिश मिडियम शाळेत पहिलीत दाखल केली होती. या वर्षी हे विद्यार्थी इयत्ता ४ थीत गेले आहेत. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना राहणे, खाणे व शैक्षणिक सुविधा, धड मिळत नाहीत अशा विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आदिवासी विकास विभागाने फेब्रुवारी महिन्यात या शाळेची मान्यता रद्द केली. त्या विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश दिला जाईल असे आदिवासी विकास प्रकल्पाने पालकांना सांगितले.
शाळा सुरु होवून तीन महिने उलटले तरीही या विद्यार्थ्यांचे कुठेच समायोजन झाले नाही. तसेच आदिवासी मुलांच्या पालकांनी अनेक वेळा जव्हार आणि डहाणू आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला विनंती व तक्रार अर्ज केले. परंतु कार्यााालया कडून कुठलीच दखल घेतली जात नव्हती, तसेच तुमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. असे प्रकल्पाकडून पालकांना सांगण्यात येत होत.
तसेच तुमच्या मुलांचे समायोजन आज करू, उद्या देवू असे सहा मिहने उलटून गेले, तरीही या ६३ मुलांचे समायोजन कुठेच केलं नाही.
तसेच त्या मुलांच्या पालकांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे लेखी तक्र ार करूनही काहीच उपयोग नसल्याने अखेर जव्हारच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर मुलांसमवेत पालकांनी सोमवार पासूूूनबेमुदत उपोषण सुरु केले आहे.
ठाणे कार्यक्षेत्रातील शहापूर तालुक्यातील अघई येथील नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, या वर्षातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये आदी मागण्या या पालकांनी केल्या आहेत.
महिने झाले तरीही मुलांना कुठल्याच शाळेत प्रवेश नाही.तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.
-शिला चौधरी, खरवंद,
पालक
आम्ही प्रकल्प अधिका-यांना, तसेच आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनाही भेटलो, या मुलांना नामांकित इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश द्या अशी विनंती केली परंतु उपायोग झाला नाही.
-विनायक थाळकर,
दापटी,पालक