‘त्या’ भिंतीचे काम पोलीस संरक्षणात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:08 AM2018-12-05T01:08:37+5:302018-12-05T01:09:26+5:30
जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व काही लोकप्रतिनिधिच्या उपस्थितीत आणि पोलीस संरक्षणात या भिंतीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे
- पंकज राऊत
बोईसर : नियोजित बोईसर ग्रामीण रुग्णालयाची संरक्षण भिंत बांधण्यास एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केला असला तरी या संदर्भात न्यायालयाकडून हे काम सुरु न करण्याबाबत कोणतेही पत्र किवा आदेश आला नसल्याने बुधवार दि.५ रोजी आरोग्य विभागाचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व काही लोकप्रतिनिधिच्या उपस्थितीत आणि पोलीस संरक्षणात या भिंतीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे
या संदर्भात पालघरच्या जिल्हा चिकित्सक डॉक्टर कांचन वानेरे यांच्याशी सम्पर्क झाला नाही परंतु अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर राजेंद्र केळकर यांनी हे बांधकाम करण्यात येणाऱ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मिळावा याकरिता जिल्हा चिकित्सकांनी पोलीस अधीक्षक व बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना मंगळवारी विनंती पत्र पाठविले असल्याचे सांगितले. हा पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्या नंतर कामाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगून या वेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर कांचन वानेरे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.
बोईसर येथील सर्व्हे नंबर १०८ ए/३० मधील अडीच एकर जमीन वन खात्याकडून पालघर जिल्हाधिकाºयांच्या माध्यमातून जिल्हा चिकित्सक (पालघर) यांच्या नावे बोईसर ग्रामीण रुग्णालय उभारण्या करीता हस्तांतरीत झाली आहे. त्यामुळे नावे झालेल्या जमिनीवर बांधकाम करण्यास काही हरकत नसावी तरीही या जमिनीचा वाद पालघरच्या न्यायालयात सुरु असून आम्ही दीड महिन्यापूर्वी न्यायालयात आरोग्य विभागा तर्फे बाजू मांडली असून २९ नोव्हेम्बर १८ रोजी या संदर्भात तारीख होती असे समजले परंतु निश्चित काय झाले ते समजले नाही म्हात्र या संदर्भात न्यायालय जे आदेश देईल त्याचे आम्ही पालन करु अशी माहिती अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर राजेंद्र केळकर यांनी पुढे दिली.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे पालघर विभागाचे उपविभागीय अभियंता महेंद्र किणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा चिकित्सक कार्यालयतून आम्ही बंदोबस्ताकरिता पोलिसांना पत्र देणार आहोत असे आज दुपारी सांगितले.