वसई-विरारचे पाणी रोखणारेच आता मतांची भीक मागत आहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:31 AM2018-05-27T06:31:38+5:302018-05-27T06:31:38+5:30

सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे.

 Those who prevent Vasai-Virar water are now begging for votes! | वसई-विरारचे पाणी रोखणारेच आता मतांची भीक मागत आहेत!

वसई-विरारचे पाणी रोखणारेच आता मतांची भीक मागत आहेत!

Next

पालघर - सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे.
गेल्या १० वर्षात बविआने जिल्ह्यात केलेली विकासकामे तसेच कार्यकर्त्यांची उभारलेली फळी लक्षात घेता त्यांना विजयापासून कसे दूर ठेवता येईल,यासाठी विरोधक निरिनराळे हाथखंडे वापरत आहेत. शुक्रवारी झालेल्या बविआच्या जाहीर सभेला लाभलेली मतदारांची उपस्थिती न भूतो न भविष्यती अशी होती.
आ.हितेन्द्र ठाकुर यानी केलेल्या विकासकामांमुळे बविआचे तीन आमदार निवडून आणण्याची किमया घडवून दाखविली. १९९० ते २००२ या काळात तब्बल एक तप हा उपप्रदेश पाणीटंचाईत होरपळला असतांना आपली राजकीय ताकद पणाला लावून आ. ठाकूर यानी सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प मार्गी लावला.वाढती लोकसंख्या लक्षात घेवून त्यानी दुसº्या टप्प्याचीही तयारी केली,अनेक अडथळे पार करत ही अतिरिक्त १०० द.ल.ली.ची पाणीपुरवठा योजनाही मार्गी लावली. परंतु हे पाणी वसई-विरारला देण्यात येवू नये, यासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले, तेच नेते आता मतासाठी झोळी घेवून फिरत आहेत.
गेल्या २५ वर्षात, बहुजन विकास आघाडीने कधीही विरोधाचे राजकारण केले नाही, उलट प्रत्येक नागरिकांचे राहणीमान सुधारावे, त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसवणाऱ्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी सातत्याने इतराना सहकार्य देऊ केले. त्याबदल्यात लोकानीही बविआला भरभरून मते दिलीत.
लोकांनी जो विश्वास बविआवर दाखवला तोच विश्वास या पोटनिवडणुकीत मतदार नक्कीच दाखवतील असा आशावाद बविआने व्यक्त केला आहे.

व्यक्तिगत प्रचारावर भर

वसई, विरार, नालासोपारा, बोईसर हा आपला बालेकिल्ला असल्याने झगमगाटी प्रचाराऐवजी मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधणारा प्रचार करण्यावर बविआने हेतूत: भर दिला होता. त्यामुळेच आपला उमेदवार विजयी होईल असा आशावाद तिने व्यक्त केला.

Web Title:  Those who prevent Vasai-Virar water are now begging for votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.