खुनाची खोटी माहिती देणाऱ्या युवकाला अटक, हजार रु पयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:08 AM2018-12-29T02:08:43+5:302018-12-29T02:09:09+5:30
वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन झाल्याची खोटी माहिती मोबाईलवरून अप्पर पोलिस अधिक्षक यांना देणाºया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
वसई : वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन झाल्याची खोटी माहिती मोबाईलवरून अप्पर पोलिस अधिक्षक यांना देणाºया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. वसई न्यायालयाने त्याला हजार रूपये दंड व एक दिवसाची सजा सुनावली.
वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश नगर , धानिवबाग या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा खुन झाला असल्याचा फोन वसईचे अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर यांना २५ डिसेंबर रोजी रात्री १२.३० आला होता. याबाबत त्यांनी वालिव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रकाश बिराजदार यांना कळवून घटनास्थळी पोलिस पथक पाठविले होते. मात्र, तेथे कोणताही गुन्ह्याचा प्रकार घडला नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत फोन करणाºया नंबरवर पोलिस सतत संपर्क करीत असताना तो प्रतिउत्तर देत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल धारकाचा नाव व पत्ता काढून त्याचा शोध घेतला असता सदर युवकाचे नाव सतिष समरजीत दुबे (३५) हा धानिवबाग, नालासोपारा येथे राहणारा असल्याचे समोर आले आहे. याबाबत सतिष दुबे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता, कोठेही खुन झाला नसल्याचे निष्पन्न झाले.