वसईत CAB आणिNRC विरोधात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचा धडकला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 09:46 PM2019-12-20T21:46:57+5:302019-12-20T22:02:32+5:30

बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.

Thousands of all-party Members rally against CAB and NRC | वसईत CAB आणिNRC विरोधात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचा धडकला मोर्चा

वसईत CAB आणिNRC विरोधात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचा धडकला मोर्चा

Next

वसई -  बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.

वसई पापडी येथील हुतात्मा स्मारक तथा टी.बी.कॉलेज येथून एनआरसी तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा- 2019 हा त्वरित रद्द व्हावा,तसेच भारतीय संविधांनाच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये, जवळपास वीस हजारांच्या संख्येने सर्वधर्म बांधव आणि खास करून मुस्लिम समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता.

अवघ्या वसई तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातून समस्त मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने हजर राहिला, एकूणच शुक्रवारी दुपारी 3 वाजता वसई पूर्व येथून आणि पुढे वसई शहरातील पापडी भागात मुख्य रस्त्यावरून हा मूक मोर्चा वसई तहसीलदार कार्यालयावर धडकला.  

यावेळी केंद्र सरकार,देशाचे पंतप्रधान,गृहमंत्री यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला गेला,यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.तर दुपारी वसईच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांशी शहरातून निघालेल्या या मोर्च्या मुळे वसई नालासोपारा विरार आदी शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हा मूक मोर्चा साधारण संध्याकाळी 6 वाजता वसई तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर पोहचल्यावर या मोर्च्याचे छोट्या सभेत रूपांतर झाले आणि त्यांनतर आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारचा निषेध नोंदवत वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना देण्यात आले,

याप्रसंगी वसई तहसीलदार यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना सर्वधर्मीय प्रतिनिधींनी केंद्र सरकार जाणीवपूर्वक ठराविक इतर समाज व खास करून मुस्लिम समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणत असल्याचा गंभीर आरोप, यावेळी समस्त सर्वधर्मीय मोर्चेकऱ्यांनी केला.

दुपारी 3  वाजता काढण्यात आलेल्या या प्रशस्त मूक मोर्चामध्ये, मुस्लीम समाजासोबत अन्य समाजातील अनेक धर्मीय नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्त्ते आणि हजारो नागरिक बहुसंखेने सहभागी झाले असल्याची माहिती सर्वधर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने समनव्यक समीर वर्तक यांनी लोकमत दिली, याउलट हा मूक मोर्चा वसईच्या कानाकोपऱ्यातून निघाला होता.तरी हा मोर्चा वसई गावात पोहचे पर्यंत अत्यंत शांततेत तो गेला कुठंही कुठलाही अनुचित प्रकार अथवा हिसंक वळण त्यास लागले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले,तर सोबत या मोर्च्याला वसईत मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं हा मोर्चा यशस्वीरीत्या व उत्तम शिस्त बद्ध नियोजन असल्यानं आम्ही वसई तहसील पर्यंत पोहचलो असल्याची प्रतिक्रिया समितीनं लोकमत ला दिली,.

"केंद्र सरकारच्या संविधान विरोधी कृतीमुळे संपूर्ण देश आज रस्त्यावर उतरला असून संबंध देश व राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.पूर्वोत्तर राज्यापासून सुरु झालेले हे आंदोलन आता संपूर्ण देशात पसरले आहे,तर देशातला तरुण परिणामांची चिंता व पर्वा न करता आपला देश ,आपले संविधान वाचविण्यासाठी खऱ्या अर्थी आज भारत मातेच्या या भूमीवरील रस्त्यावर उतरला आहे.
समन्वयक - समीर वर्तक
सर्वधर्म संविधान बचाव समिती,वसई तालुका     .

"या मूक मोर्च्या साठी आम्ही अगोदरच वसईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता,त्यातच  वाहतुकीचे उत्तम नियोजन व त्याची आखणी करून हि ठेवली होती.त्यामुळे कुठंही फार काळ वाहतूक कोंडी राहिली नाही,अथवा वसई विरार मध्ये कुठंही अनुचित प्रकार अथवा काही अप्रिय घटना घडली नाही सर्वत्र शांतते त हा मोर्चा गेला सर्वांनी सहकार्य केल्यानेच आम्ही उत्तम नियोजन करू शकलो,"
-  विजयकांत सागर  
अप्पर पोलीस अधीक्षक,वसई

Web Title: Thousands of all-party Members rally against CAB and NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.