नवापूर खाडीतील हजारो मासे प्रदूषणबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:55 AM2018-04-10T02:55:37+5:302018-04-10T02:56:28+5:30
नवापूर आणि उच्छेळी-दांडीच्या खाडीत तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित रासायनिक पाणी सोडल्यानंतर मृतावस्थेत पडलेल्या माशाचा ढीग नवापूर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी टेम्पोद्वारे तारापूर प्रदूषण मंडळाच्या कार्यालयातील टेबलावर फेकला.
पालघर/बोईसर: नवापूर आणि उच्छेळी-दांडीच्या खाडीत तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित रासायनिक पाणी सोडल्यानंतर मृतावस्थेत पडलेल्या माशाचा ढीग नवापूर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी टेम्पोद्वारे तारापूर प्रदूषण मंडळाच्या कार्यालयातील टेबलावर फेकला. यावेळी खाडीतील प्रदूषीत पाण्या ऐवजी वेगळेच पाणी प्रदूषण मंडळाने तपासासाठी पाठविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एमआयडीसी तारापूरच्या औद्योगिक वसाहती मधील काही कारखान्यांमधून प्रक्रि या न केलेले रासायनिक प्रदूषित पाणी नवापूर, उच्छेली-दांडी, मुरबे, खारेकुरण खाडीत सोडण्यात येत असल्याने खाडीतील मत्स्य संपदा नामशेष होऊ लागली आहे. तक्रारी अर्ज अन् आंदोलने करणारेच या कंपन्यामधील ठेके घेऊन गब्बर झाल्याने प्रदुषणाच्या मुद्यावरील येथील आंदोलने इतिहास जमा झाली आहेत. मच्छीमारांच्या दृष्टीने अत्यंत महत्व पूर्ण असलेला नवापूर गावातून गेलेला प्रदूषित पाण्याच्या पाईपलाईन चा प्रश्न हरित लवादाच्या न्यायालयात दाखल झाल्याने मच्छीमारांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र हरित लवादात दाखल केलेली याचिका ही नवापूर गावातून गेलेल्या प्रदूषित पाईपलाईन विरोधात नसल्याचे सत्य सर्वांसमोर उघड झाल्या नंतर या प्रदूषणा विरोधात लढणाºया तरु ण मच्छीमार युवकाना प्रचंड धक्का बसला. या बाबत अनेक स्पष्टीकरण देण्यात आली असली तरी तरु णामध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना वाढीस लागली असून त्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष पसरल्याचे दिसून आले आहे. सोमवारी नवापूर खाडीला ओहोटी लागल्यानंतर खाडीच्या पाण्यातील आॅक्सिजन चे प्रमाण कमी झाल्याने शेकडो बोय, शिंगटी आदी जातीचे मासे मृतावस्थेत किनाºयावर पडलेले आढळून आले. नवापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उदय मेहेर उपसरपंच हेमंत बारी, सदस्य अधिराज किणी, कामीनी भोईर, रेवती पागधरे, पूनम अंभिरे ग्रामस्थ कश्यप बारी सुदर्शन अंभिरे चेतन बारी प्रशांत भोईरह सह अनेक सदस्यांनी किनाºयावरील घटनास्थळाची पाहणी केली. एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह अनेक विभाग या प्रदूषणा बाबत संवेदनशील नसल्याने नवापूरवासीयांनी सर्व मासे एकत्र टेम्पोत भरून दोन्ही विभागाच्या कार्यालयातील टेबलावर फेकले.
नवापूर गावातून गेलेल्या प्रदूषित पाण्याच्या पाईप लाईन बद्दल हरित लवादामध्ये याचिका दाखल करण्याची मागणी असताना प्रदुषणाबाबत भलतीच याचिका दाखल झाल्याने तरु णां मध्ये प्रचंड संताप आहे.
- कुंदन दवणे, माजी युवा पदाधिकारी.अभामा समाज.
या नवापूर पाईपलाईन प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा झाला असून अश्या समाज विघातक लोकांचा बुरखा फाडून त्यांना समाजा समोर आणणे गरजेचे आहे.
- आशिष पागधरे.
ग्रामस्थ नवापूर
या प्रदूषणाचे गंभीर परिणाम ग्रामस्थांना सोसावे लागत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एटीपी विभागातील अधिकारी यावर उपाय योजना आखीत नसल्याने संतप्त झालेल्या लोकांनी मृत मासे त्यांच्या कार्यालयाला भेट दिले.
- अधिराज किणी,
ग्रामपंचायत सदस्य.
>सी.ई.टी.पी.च्या क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी
एमआयडीसित २५ एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र (सी. ई. टी. पी. ) कार्यान्वित असून तेथे औद्योगिक क्षेत्रातून येणाºया रासायनिक प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते सांडपाणी नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येते परंतु या पूर्वी अनेक वेळा त्या केंद्राच्या क्षमते पेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी येत असल्याने अतिरिक्त सांडपाण्यावर प्रक्रि या न करताच ते सरळ समुदात सोडण्यात यायचे तर काही ठिकाणी सांडपाण्याची पाईपलाईन फुटून त्या मधील प्रदूषित पाणी नाल्या वाटे खाडी किनारी वाहत जात असते.मागील महिन्याच्या २८ व २९ तारखेला असेच माठ्या प्रमाणात लाल रंगाचे रासायनिक सांडपाणी नवापूर खाडी किनारी प्रचंड प्रमाणात आढळताच नवापुरचे सरपंच उदय मेहेर यांनी ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिल्या होती. त्यानंतर ३१ मार्चला संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्याच वेळी सरपंच मेहेर यांनी या घटनेची गंभीर दखल त्विरत न घेतल्यास प्रजननासाठी मोठ्या प्रमाणात खाडी किनारी येणारे मासे मृत पावतील अशी भीती व्यक्त केली होती.
किनाºयावर मासे मेल्या नंतर ते कुजून पसरणारी दुर्गंंधीमुळे आमच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम व होणाºया त्रासाची जाणीव म्हणून आम्ही मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राच्या कार्यालयात टाकले तर आजच्या घटने मुळे पारंपरिक मासेमारी करून उदरनिर्वाह करणाºया कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. सदर घटनेची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन केले जाईल.
- उदय मेहेर, सरपंच, नवापूर