पालघर जिल्ह्यातील हजारो पदे रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:33 AM2017-08-01T02:33:07+5:302017-08-01T02:33:07+5:30

तीन वर्षे झाली तरी जिल्ह्यातील ३१ विविध विभागांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असून कामाचा भार वाढतच चालला असून त्याचा परिणाम विकास कामावर होत आहे.

Thousands of posts are vacant in Palghar district | पालघर जिल्ह्यातील हजारो पदे रिक्तच

पालघर जिल्ह्यातील हजारो पदे रिक्तच

Next

पालघर : तीन वर्षे झाली तरी जिल्ह्यातील ३१ विविध विभागांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असून कामाचा भार वाढतच चालला असून त्याचा परिणाम विकास कामावर होत आहे.
जिल्ह्याच्या विविध पद अनुषेशात जिल्हा परिषद अग्रक्रमावर असून ती मधील वर्ग एक ते वर्ग चार मधील एकूण ३०८९ पदे आज तीन वर्षानंतरही रिक्त आहेत. त्यात महत्वाच्या अशा बाल विकास प्रकल्पाधिकाºयांची बहुसंख्य पदे रिक्त असल्यामुळे कुपोषणासंबंधीचे प्रश्न हाताळण्यावर परिणाम होत आहे.
जिल्हा परिषदेच्या या पदभरतीबाबतीत कर्मचाºयांच्या विकल्पाबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून कर्मचाºयांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर पदभरती प्रस्तावित आहे असे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी म्हटले आहे. पालघर जिल्ह्यातील कार्यरत कार्यालयातील एप्रिलपर्यंतची मंजूर व रिक्त पदे खालीलप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत उपजिल्हाधिकारी संवर्गातील १३ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत, तहसीलदार १७ पदे मंजूर तर ५ पदे रिक्त, नायब तहसीलदार ४४ पदे मंजूर तर ७ पदे रिक्त, लेखाधिकारी ३ मंजूर तर १ रिक्त, उपलेखपाल ३ मंजूर तर १ रिक्त, लघुलेखक उच्च व निम्नश्रेणी एकूण ८ मंजूर ५ रिक्त, लघु टंकलेखक २ मंजूर दोनही रिक्त, अव्वल कारकून १४२ मंजूर तर ३३ रिक्त,मंडळ अधिकारी ३४ मंजूर तर ११ पदे रिक्त, लिपिक १८७ तर ४७ पदे रिक्त,तलाठी १८४ तर ४३ पदे रिक्त,वाहनचालक २० मंजूर तर १३ रिक्त, शिपाई १३४ मंजूर तर ४५ पदे रिक्त, कोतवाल १८४ मंजूर तर ७६ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेतील वर्ग १ मधील १०७ पदे मंजूर तर २४ रिक्त,वर्ग २ ची १३२ मंजूर तर ६२ रिक्त,वर्ग ३ ची १३१०२ तर २७६७ रिक्त,वर्ग ४११९८ मंजूर तर २३६ पदे आजही रिक्त अशी एकूण ३०८९ पदे रिक्तच आहेत. पोलीस अधीक्षक व सलंग्न कार्यालयातील वर्ग १ ते वर्ग ४ मधील ३२६४ पदे मंजूर असून पैकी ३०७ पदे रिक्त आहेत.
जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात वर्ग १ ते वर्ग ४ अशी एकूण ४९ पदे मंजूर असली तरी ७ पदे रिक्त आहेत. कामगार उप आयुक्त कार्यालयातील वर्ग १-४ मधून एकूण २४ पदे मंजूर तर १७ पदे रिक्त आहेत. ६)जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागातील १५४ मंजूर पदांपैकी ४३ पदे रिक्त आहेत.
जिल्हा नियोजन समिती/मानव विकास विभागातील चारही संवर्गातील १९ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय अंतर्गतची चारही वर्गातील एकूण ४९९ पदे मंजूर असून १५४ पदे रिक्त
आहेत.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयातील एकूण १२ पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजलसर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयातील १८ मंजूर पदे असून १६ पदे रिक्तच आहेत.
जिल्हा शल्यचिकित्साक आस्थापनेत चारही वर्गातील ३६० मंजूर पदांपैकी १२६ पदे रिक्त आहेत. समाजकल्याण विभागात एकूण चार वर्गातील ११ पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील एकूण ६० पदांपैकी ३५ पदे रिक्त आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई अंतर्गत ४९ ंपैकी १५ पदे रिक्त
आहेत.
उत्पादन शुल्क कार्यालयात चारही संवर्गातील ७६ पैकी २६ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात मंजूर २३४ पदांपैकी ११३ पदे रिक्त आहेत. ही पदे कधी भरली जाणार हे मंत्र्यांपासून ते संत्र्यांपर्यंत कोणही सांगू शकत नाही.

Web Title: Thousands of posts are vacant in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.