२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 02:59 AM2018-11-07T02:59:59+5:302018-11-07T03:00:19+5:30

वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता.

Thousands of Thirteen Thousand subscribers have tired of 51 crore, disrupting supply of the defaulters | २८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

Next

नालासोपारा - वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रु पयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. या थकीत रकमेची वसूली कशी करायची असा प्रश्न आता महावितरणाला पडलेला आहे.
वसई तालुक्यात एकूण ८ लाख १४ हजार ७१६ वीज जोडण्या आहेत. त्यात २५ हजार औद्योगिक, ४० हजार व्यावसायिक जोडण्यांचा समावेश आहे. वसई विभागातून तब्बल ५१ कोटी रूपयांची वीज थकबाकी असल्यची माहिती महावितरणाने दिली आहे. त्यामुळे या आॅक्टोबर महिन्यात २८ हजार २२६ थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामधील ११ हजार ६३४ ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
एकीकडे वीज थकबाकीदारांच्या रकमा कोट्यवधींच्या घरात जात असून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत आहे. त्यामुळे महावितरणाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
महावितरणची एकूण ५१ कोटी रु पये इतकी वीजबिलांची थकबाकी असून थकबाकी वसूल करण्याचे काम सुरु च आहे. येत्या ३१ आॅक्टोबर पर्यंत ५० टक्के इतकी तरी रक्कम वसूल करण्याचे ध्येय आमच्या विभागाने ठेवले असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली होती. या आकडेवारीचा बोझा कंपनीवर आहे.
ज्यांची वीज बिले थकीत आहेत ते मात्र मोकाट फिरत असून त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यास महावितरण विभाग कुचकामी ठरला आहे. त्यासाठी येथील ग्राहकांना वीज बील हे वेळेवर न देता ते बिलाची तारीख निघून गेल्यावर देण्यात येत असल्याने सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत असतो. यावर अनेक वेळा तक्र ारी करूनही वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

१७८ कोटीची आतापर्यंत झाली वसुली

महावितरण कंपनी बाकी असलेल्या थकीत बिलांची रक्कम योग्य रित्या वसूल करण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.

वसई, विरार, सोपारा, वाडा अशा तीन विभागात महावितरणाला वीज ग्राहकांकडून उत्पन्न मिळत असते. आॅक्टोबर महिन्यात २१८ कोटीचे उद्दीष्ट असून १७८ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक अभियंत्यांनी दिली.

Web Title: Thousands of Thirteen Thousand subscribers have tired of 51 crore, disrupting supply of the defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.