कल्पेश हत्याप्रकरणी तिघा आरोपींना अटक
By admin | Published: October 16, 2016 03:32 AM2016-10-16T03:32:41+5:302016-10-16T03:32:41+5:30
कुंभवली येथील कल्पेश पिंपळे (३०) ह्याच्यावर बोईसर-कुंभवली मार्गावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याच्या मृत्यू प्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुरबे
पालघर : कुंभवली येथील कल्पेश पिंपळे (३०) ह्याच्यावर बोईसर-कुंभवली मार्गावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याच्या मृत्यू प्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुरबे येथील विशाल भारत वैती (२४), सुमित अनिल पाटील (१९), काशिनाथ जयराम काळबांडे (२७) ह्या तीन आरोपीना अटक केली आहे. त्यांना १७ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बोईसर जवळील कुंभवली येथे राहणाऱ्या कल्पेश पिंपळे ह्याचे बोईसरच्या एमआयडीसी वसाहतीमध्ये साई वेदान्त नावाचे मनी ट्रान्सफरचा व्यवसाय होता. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता कल्पेश आपल्या आॅफिस मध्ये जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम, लॅपटॉप, एका बॅगेत भरून आपल्या घराकडे निघाला होता. रोज लाखो रुपयांची रक्कम जमा करून जात असल्याची माहिती आरोपींना होती. त्याप्रमाणे त्यांनी ९ आणि १० सप्टेंबरला कल्पेश येत असलेल्या मार्गाची टेहळणी केली. आणि ११ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी तो दुचाकीवरून बोईसर-कुंभवली रस्त्या वरून निर्मनुष्य जागेवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या गळ्यातील चैन, पैसे आणि लॅपटॉप असलेली बॅग घेऊन आरोपीनी पळ काढला होता. (प्रतिनिधी)
...हे अखेरचे वाक्य
त्या जखमी अवस्थेत आपल्या स्कुटीवर बसून कल्पेश ने आपले घर गाठीत ‘प्रदीप बांबू’ असे सांगून तो घरात बेशुद्ध पडला.
त्याला उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रु ग्णालयात दाखल करण्यात आले असताना उपचार सुरु असतांना त्याचे निधन झाले.
ह्या प्रकरणी त्यांचा नातेवाईका सह शेकडो लोकांनी बोईसर पोलीस स्टेशन ला त्याचा मृतदेह आणून जो पर्यंत संशियत आरोपीना अटक होत नाहीत तो पर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला होता.