4 वर्षाच्या चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणी तिघांना अटक
By admin | Published: January 14, 2017 09:36 PM2017-01-14T21:36:41+5:302017-01-14T21:36:41+5:30
भाईंदर येथे चार वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण, बलात्कार व हत्या करुन तीचा मृतदेह पुरल्या प्रकरणी तीघा आरोपींना अटक करण्यात आली
Next
ऑनलाइन लोकमत
मीरारोड, दि. 14 - भाईंदर येथे चार वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण, बलात्कार व हत्या करुन तीचा मृतदेह पुरल्या प्रकरणी तीघा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे. बलात्कार व हत्या करणारा मुख्य आरोपी हा मुलीच्या वडिलांकडे काम करायचा . सर्व आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशचे असुन मुलीचा मृतदेह सापडल्या नंतर ३६ तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला असे ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. विशेष म्हणजे हत्ये नंतर देखील आरोपी कुठे पळुन न जाता त्याच भागात रहात होते.
भाईंदर पुर्वेच्या आझाद नगर मध्ये राहणारी चार वर्षाची मुलगी हुमेरा महिबरुरजा कुरेशी ही ९ जानेवारी रोजी रात्री घरा बाहेर खेळत असतानाच बेपत्ता झाल्या प्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी सायंकाळी आझाद नगर मागील नाल्यात मांजर माती खणत असल्याने पाहण्यास गेलेल्या दोघा मुलांना मातीच्या बाहेर आलेली हाताची व पायाची बोटं दिसुन आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो हुमेराचा होता. हुमेराचे कपडे जवळच पडलेले आढळुन आले.
या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरीक्त पोलिस अधिक्षक प्रशांत कदम, नवघरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल वाघ आदींची 4-5 पोलिस पथकं तपास करत होती. नवघर पोलिसांनी या प्रकरणी परिसरातील २५-३० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. फॉरेन्सीक पथक देखील दोन दिवस तपास करत होते. जे.जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तर तीच्यावर बळजबरी झाला की नाही ? याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल वाघ सह अविनाश गर्जे व अशोक पाटील या पोलिसांनी त्यांच्या चौकशीतुन त्याच भागात राहणारया मोहम्मद युनुस हाजी महंमद बशीर शहा उर्फ झीरो उर्फ झीरु (24) याला ताब्यात घेतले. चौकशीत युनुसने चॉकलेट घेऊन देतो म्हणुन हुमेराला कडेवर उचलुन नेले. चॉकलेट दिल्यावर तीला तो निर्जन नाल्या जवळ घेऊन गेला. तेथे त्याचे परिचीत मोहम्मद रोजान इसहाक राईनी उर्फ लंगडा (38), जितेंद्र उर्फ जितु तिर्थप्रसाद राव (32) व राजेश हे आधी पासुनच होते. युनुसने तेथेच त्या चिमुरडीवर जबरी बलात्कार केला. ती मोठय़ाने रडु लागल्याने युनुस ने तीचे तोंड दाबले तसेच तीच्या डोक्यावर दगड सारख्या कठीण वस्तुने प्रहार केला. यातच तीचा मृत्यु झाला. ती मरण पावल्याचे समजताच नाल्यातच तीचा मृतदेह पुरुन टाकला. तेथुन जवळच्याच विहरीवर जाऊन त्यांनी हातपाय धूतले व एका हॉटेल मध्ये जाऊन जेवण केले. इतके झाल्या नंतर देखील ते पळुन गेले नाहीत. परिसरातच भटकत होते.
मुख्य आरोपी युनुस हाती लागुन गुन्हा उघड होताच त्याने सांगितलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला. दरम्यान रोजान व जितेंद्रला नवघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले होते. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी आणले. चौकशीत दोघांनी हुमेराचा मृतदेह पुरण्यात मदत केल्याचे कबुल केले. युनुसच्या अंगावर व गुप्तांगावर जख्मा आढळुन आल्या आहेत. चौथा आरोपी राजेश मात्र पसार झाला असुन त्याचा शोध सुरु आहे.
सर्व आरोपी हे आझाद नगर मागील मैदानातील झोपडय़ात रहायचे. भंगार गोळा करणे, माल वाहणे आदी मिळेल ते काम करायचे. गांजा आदीचे व्यसन त्यांना असुन मुख्य आरोपी युनुसला अश्लील क्लीप पाहण्याचा शौक होता. तो हुमेराच्या वडिलांच्या टॅम्पोत भांगार आधी भरण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याचे त्यांच्या घरी नेहमीचे येणे जाणे होते.
स्थानिक गुन्हे शाखेने एकंदर घटना पाहता मुलीला ओळखणारे तसेच तीच्या घरी येणे- जाणे असणारयांची चौकशी सुरु केली. यात त्यांना बच्चे नावाच्या 19 वर्षाच्या तरुणा कडुन झीरो म्हणजेच युनुस हा हुमेराला नेहमीच चॉकलेट देत असल्याचे समजले. पोलिसांनी वेळ न दवडता युनुसला ताब्यात घेतले आणि चौकशीत अपहरण, बलात्कार व हत्येचा हा गुन्हा उघड झाला.