आरोग्य विभागाचे तीनतेरा

By admin | Published: October 8, 2015 11:14 PM2015-10-08T23:14:01+5:302015-10-08T23:14:01+5:30

९५ टक्के आदीवासी बहुल अतिदुर्गम, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा अशा व डोंगरदऱ्यात वसलेल्या या तालुक्यात आरोग्य सुविधेसाठी, पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक आरोग्य व उप-आरोग्य

Three categories of health department | आरोग्य विभागाचे तीनतेरा

आरोग्य विभागाचे तीनतेरा

Next

जव्हार : ९५ टक्के आदीवासी बहुल अतिदुर्गम, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा अशा व डोंगरदऱ्यात वसलेल्या या तालुक्यात आरोग्य सुविधेसाठी, पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक आरोग्य व उप-आरोग्य केंद्रावरच येथील जनतेला अवलंबून राहावे लागते. कुपोषण, दुषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात असते.
सर्पदंश, गरोदर माता व गंभीर रुग्णांना परिवहनाच्या अपुऱ्या साधनांमुळे अनेक वेळा डोलीने आजही उपचारासाठी रुग्णालयात आणावे लागते.परंतु त्या शासकीय दवाखान्यातील आधीच अपुऱ्या व बहुसंख्य रिक्त असणाऱ्या पदांमुळे नातेवाईकाना रुग्णाला घेऊन रात्री अपरात्री जव्हार ग्रामीण रुग्णालयात आणावे लागते. गंभीर बाब म्हणजे त्या आरोग्य केंद्रा बाहेर रुग्णासाठीची शासकीय जीप उभी असते परंतु त्या जीप ला चालकच नसल्यामुळे रुग्नाला पदरमोड करून भाड्याच्या गाडीने जव्हारला आणावे लागते.
आरोग्य व्यवस्थेच्या या रामभरोसे कारभारा मुळे आजतागायत शेकडो गरोदर माता, बालके, अपघातग्रस्त व साथीच्या रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत परंतु शासन दरबारी या मृत्यूंची नोंद ही वाटेत मृत्यू होत असल्यामुळे यापुढे अशा मृत्यूंचीनोंद ही शासनाने अनास्थेमुळे झालेले मृत्यू अशी करावी अशी मागणी श्रमजीवीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी गुरुवारी येथे केली. तालुक्यातील संपूर्ण आरोग्य विभागावर, केंद्र व उप-केंद्रांवर नियंत्रण ठेवणारे तालुका आरोग्य अधिकारी पद अनेक महिने रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागच व्हेन्टिलेटरवर असल्याची टीकाही त्यांनी केली. जव्हार शासकीय विश्राम गृहात विवेक पंडित यांनी श्रमजीवीच्या तालुका व शहर पदाधिकार्यांकडून तालुक्यातील आरोग्य समस्येबाबत आढावा घेतला. तालुक्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रे येथील रिक्त पदे तात्काळ भरावेत यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जव्हार तालुका आरोग्य विभाग
संवर्गमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
तालुका आरोग्य अधिकारी१०१
वैद्यकीय अधिकारी गट (अ)४४०
वैद्यकीय अधिकारी गट (ब)९५४
विस्तार अधिकारी (आरोग्य)२११
आरोग्य पर्यवेक्षक११०
आरोग्य सहाय्यक (पुरूष-जि. प)१०१००
आरोग्य सहाय्यक (पुरूष- राज्य)३३०
आरोग्य सहाय्यक (स्त्री)८५३
औषध निर्माता अधिकारी८५३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ४४०
कुष्टरोग तंत्रज्ञ११०
आरोग्य सेवक (पुरूष-जि.प)१९१४५
आरोग्य सेवक (पुरूष-राज्य)१२१२०
आरोग्य सेवक (म)३९३२७
कनिष्ठ लिपीक५४१
वाहन चालक९२७
शिपाई२६१७९
सफाई कामगार८२६
एकूण१६९१२२४७

Web Title: Three categories of health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.