जव्हारमध्ये अवलिया पीर शहा सद्रुद्दीन चिश्ती यांचा आजपासून तीन दिवस शाही उरूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 05:44 AM2017-09-11T05:44:49+5:302017-09-11T05:45:05+5:30
- हुसेन मेमन
जव्हार : जव्हारची शेकडो वर्षाची परंपरा असलेला व हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेला अवलीया पीर शहा सद्रुद्दीन बद्रुद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांचा ५६५ वा उरूस सोमवार पासून सुरू होणार असून तो बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
पहिल्या दिवशी बाबांचा संदल तर दुसºया दिवशी शानदार चादर मिरवणूक, रातीफ खेळ व रात्री येणाºया जव्हारमधील सर्व हिंदु-मुस्लिम व पाहुण्यांसाठी लंगर (भंडारा) चे आयोजन व रात्री कव्वालीचा शानदार मुकबला व तिसºया दिवशी शाही परंपरा असलेले राजे यांच्या हस्ते जुना राजवाडा येथे झेंडा फलक व ख्वाजा गरीब नवाज यांचा संदल शरीफ असे कार्यक्रम पार पडणार आहेत. याकरीता उर्स जलसा कमेटीतर्फे गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू होती. लाखो भाविक या ऊरुसात सहभागी होतात. दर्गाह रोडवर लायटींगची व्यवस्था, मंडपाची, स्टेजची व्यवस्था, तर ठिकठिकाणी लागणारी दुकाने आदिची व्यवस्था उर्स जलसा कमेटीचे अध्यक्ष अलताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास गेली आहे.
तसेच एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर विविध पाळणे व इतर दुकाने येण्यास सुरवात झालेली आहे, एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर पावसामुळे नेहमी चिखल होत असे, त्यामुळे उरूसात येणाºया लोकांना खूपच त्रास होत होता, तो टळावा यासाठी नगर पालिकेने ग्राऊंडवर खडी व माती मुरूमाचा भराव घालण्यात आलेला आहे.
त्यामुळे यंदाच्या उरूसामध्ये पाऊस आला तरी ग्राऊंड मध्ये चिखल होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आलेली आहे. हा ऊरुस शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.